Gharkul Yojana D Yadi Kashi Pahavi :- नमस्कार सर्वांना राज्यातील गोरगरीब जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महा-आवास अभियानाचा पहिल्या टप्प्यात 5 लाख घरी पूर्ण बांधून झाली. आता महा आवास अभियान 2 मधील आणखी 5 लाख घरे 31 मार्च 2022 पर्यंत बांधणी करावे
अशा सूचना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. अर्थातच आता आणखीन राज्यामध्ये पाच लाख घरे येत्या दीड ते दोन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती काय आहे हे जाणून घेणार आहोत
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल D ची यादी कधी येणार आहे याची देखील माहिती सरकारने जाहीर केली आहे. तर या बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर जाणून घेऊ शकता संपूर्ण अशी माहिती.
Gharkul Yojana D Yadi Kashi Pahavi
ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी सातत्याने शासन मागणी करत आहे. आणि ही मागणी आपण महा आवास अभियान पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख घरे बांधून झालेली आहे आणि आता महा वास अभियान 2 अंतर्गत आणखी पाच लाख घरे बांधण्याचा माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
महा आवास योजना महाराष्ट्र
मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, कोरोना काळ असतानाही महाआवास अभियानाचा. पहिल्या टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
अनेक वर्षापासून बेघर आणि गरजू लोकांची यादी तयार करण्यात आली होती, मात्र त्यांना घरे मिळत नव्हती. या गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम राबविण्यास आपण सुरूवात केली.
या मोहिमेमुळे वेळेत घरे तयार करण्याची जिद्द आणि जागृती अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 5 लाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे.
घरकुल ड यादी योजना कशी पहावी ?
महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गुणात्मक व संख्यात्मक बदल करण्यात आला. त्यात लॅंड बॅंक, सॅंड बॅंक, बहुमजली गृहसंकुले या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केल्या. मंजुरीनंतर पहिला हप्ता वितरीत करण्याचा कालावधी 37
दिवसावरून 7 दिवसांवर आणावा. मंजुरीनंतर घरकुले वेळेत पूर्ण करावीत. प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित मंजुरी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. भूमिहिन लाभार्थ्यांना तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी यावेळी केल्या.
घरकुल यादी ड योजना
घरकुलाला अधिक गती मिळावी यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाने ‘ड’ प्लस यादीला मान्यता दिली असल्याने 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यास 100 टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात यावी. नाविण्यपूर्ण घरे बांधण्याचे जे काम अपूर्ण आहेत,
ती कामे जलदगतीने पूर्ण करावीत.आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. असे निर्देशही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
📢 शेळी पालन शेड अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा