harbara top variety :- हरभरा जाकी 9218 प्रसारित वर्ष 2005 आहे. या संशोधन केंद्र आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यासाठी जमीन मध्यम ते भारी काळीजमीन आणि पेरणीचं कालावधी ऑक्टोबर चा पहिला पंधरवाडा ते नोव्हेंबर चा पहिला आठवडा आहे.
प्रति एकर बियाणे यासाठी 30 ते 35 किलो लागू शकतो. पिकाचे कालावधी 105 ते 110 दिवस उत्पादकता क्षमता सरासरी 18 ते 20 क्विंटल हेक्टरी आहे.
harbara top variety
हरभरा फुले विक्रम
हरभरा फुले विक्रम आहे. फुले विक्रम यांचे प्रसारित वर्ष 2016 आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडून याला प्रसारित करण्यात आलेला आहे. यासाठी जमीन सुद्धा मध्यम ते भारी, काळी जमीन असावी. पेरणीचा कालावधी जिरायती 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर बागायती 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर प्रति प्रती 30 किलो लागू शकतो.
पिकाचा कालावधी आहे 105 ते 110 दिवस उत्पादकता याची 16 क्विंटल प्रति हेक्टर जिरायतीसाठी बागायतीसाठी 22 क्विंटल हेक्टरी. याला थोडासा उशीरा पेरणी केल्यास 21 क्विंटल प्रति हेक्टर या ठिकाणी आपल्याला उत्पादन पासून मिळू शकते.