Havaman Andaj Punjab Dakh | पंजाब डख नवीन हवामान अंदाज या भागात अवकाळी पाऊस पहा अपडेट

Havaman Andaj Punjab Dakh

Havaman Andaj Punjab Dakh :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असा हवामान अंदाज पंजाब डख साहेब यांनी नुकताच हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. या हवामान अंदाजानुसार राज्यात कोणकोणत्या ठिकाणी कसा पाऊस असेल ? याबाबत पंजाब डख माहिती दिलेली आहे. किती तारखेपर्यंत पाऊस हा महाराष्ट्र मध्ये असणार आहे. व कोणत्या भागात कसा पाऊस असेल याबाबत संपूर्ण माहिती पंजाब डख यांनी दिलेली माहिती लेखात पाहूयात.

Havaman Andaj Punjab Dakh

जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर. आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जवळ जवळ जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा अढळ विश्वास असणारे महाराष्ट्रातील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह 

पंजाब रावांनी जो काही हवामान अंदाज वर्तवला आहे त्यानुसार आज पासून राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून सात आणि नऊ ऑगस्ट दरम्यान राज्यातील जवळपास सगळ्याच ठिकाणी चांगला पाऊस बघायला मिळणार आहे.

परंतु सात आणि आठ या दोन तारखांना महाराष्ट्रातील धुळे,जळगाव,नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 9 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

यासोबतच जर आपण विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ त्यासोबतच मराठवाडा या विभागांना देखील नऊ तारखेपर्यंत जोरदार पावसाचा इशारा पंजाबराव यांनी वर्तवला आहे.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !