Hawaman Vibhagacha Hawaman Andaz | राज्यात या भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस

Hawaman Vibhagacha Hawaman Andaz :  नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. ती म्हणजे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिला आहे. पहा कोणत्या भागात होणार मुसळधार पाऊस हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Hawaman Vibhagacha Hawaman Andaz

राज्यात सध्या विविध ठिकाणी जोरदार (Maharashtra Rain) पाऊस होत आहे. सातारा, सांगली कोल्हापूर, मुंबई यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस(Heavy Rain in Maharashtra) झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता हवामान खात्याने(IMD on Maharashtra Rain) आणखी इशारा दिला आहे.

हवामान अंदाज मराठवाडा आज

राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसादरम्यान हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. येत्या 4, 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाई अर्ज 

इतकेच नव्हे तर विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान अंदाज मराठवाडा

येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता. या कालावधीत कोकण,मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता. Day 5 कोकण,मध्य महाराष्ट्र,विदर्भात जोरदार पाऊस.

राज्याच्या कोणत्या भागात होणार पाऊस 

राज्यात मुसळधार पावसाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या महापुराचा सर्वाधिक फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसतो. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव, कळंबा तलाव, राजाराम तलाव आणि महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळीवर वाढली आहे.

हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईलवरून पहा ते कशी 

 कोल्हापुरात काल संध्याकाळी एनडीआरएफची 2 पथकं दाखल झाली आहेत. यामध्ये 25 जवानांचा समावेश आहे. मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आलेले आहे.

CM Eknath shinde

राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या  संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना (NDRF) तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अतर्गत शेळी,मेंढी,कुकुट पक्षी,गाई पालन साठी मिळते अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !