Heavy Rain in Maharashtra | पहा पुढील काही दिवस कसा असेल महाराष्ट्रात पाऊस

Heavy Rain in Maharashtra

Heavy Rain in Maharashtra:  राज्यात सध्या विविध ठिकाणी जोरदार (Maharashtra Rain) पाऊस होत आहे. सातारा, सांगली कोल्हापूर, मुंबई यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता हवामान खात्याने(IMD on Maharashtra Rain) आणखी इशारा दिला आहे.

सध्या कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईतही जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच वेधशाळेने येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

Heavy Rain in Maharashtra

असे असले तरी नगर जिल्ह्यात मात्र फार मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही. या कालावधीत कोकण,मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 हेही वाचा :- शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु येथे करा ऑनलाईन अर्ज 

विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान अंदाज मराठवाडा आज

राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसादरम्यान हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. येत्या 4, 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतकेच नव्हे तर विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

लाईव्ह हवामान अंदाज

तर नगर जिल्ह्यात केवळ ८ जुलैला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात अन्यत्र पाऊस होणार असला तरी नगरला पावसासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता अधिक दिसते.
राज्यात मुसळधार पावसाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या महापुराचा सर्वाधिक फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसतो. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव, कळंबा तलाव, राजाराम तलाव आणि महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळीवर वाढली आहे. कोल्हापुरात काल संध्याकाळी एनडीआरएफची 2 पथकं दाखल झाली आहेत. 

 


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !