How to Increase Soybean Yield | सोयाबीन पिकाला आधिक फुल, शेंगाधारणा करिता हीच फवारणी करा पहा सविस्तर

How to Increase Soybean Yield :- नमस्कार सर्वांना. महत्वाची अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ती माहिती म्हणजेच सोयाबीन पिकावर कोणती फवारणी करावी ?, जेणेकरून ज्या फुलधारणा आहेत किंवा शेंगा आहेत. याची जबरदस्त वाढ होऊन आपल्याला आर्थिक उत्पादन घेता येऊ शकते. आणि आपण आर्थिक नफा सोयाबीनमधून कमवू शकतात. तर त्यासाठी फुल, शेंगा लागण्यासाठी कोणती फवारणी करावी लागते ?. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेली आहे, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. आणि आपले इतर शेतकरी बांधवांना लेख शेअर नक्की करा.

How to Increase Soybean Yield

सध्या सोयाबीन ला फुलधारणा होत आहे. आणि सोयाबीन पिवळी ही पडलेली आहे वाढ ही कमी प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत की आता नेमकी कोणती फवारणी घ्यावी. जेणेकरून जास्तीत जास्त फुलधारणा होईल व पिवळेपणा ही जाईल. आणि जास्तीत जास्त शेंगा लागून शेतकऱ्यांचे उत्पादन हे वाढेल. तर यासाठीच संपूर्ण माहिती तुम्ही वाचा या मध्ये कोणती फवारणी करून आपण जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो.

सोयाबीन पिकांची फुलधारणा वाढण्यासाठी उपाय 

सोयाबीनचे उत्पादन फुलधारणेवर आणि शेंगांवर अवलंबून असते. आणि जेवढे जास्त फुले असतील तेवढ्या जास्त शेंगा झाडाला लागतात. आणि जेवढ्या जास्त शेंगा झाडाला येतील तेवढे सोयाबीनचे उत्पादन मिळते. त्यासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार जर फवारणी घेतली तर जबरदस्त फुले सोयाबीनला लागणार.

सोयाबीन पिकाला फवारणी कशी करावी ? 

सर्वातप्रथम ही फवारणी घेत असताना – फुल धारणेसाठी फवारत असलेल्या टॉनिक सोबत आळीनाशक, बुरशी नाशक आणि सोबतच विद्राव्य खताचा समावेश करणार आहोत. ही फवारणी करत असताना ईमामेक्टीन(Emamectin) त्यासोबतच गोदरेज डबल नावाचे टॉनिक आणि साफ(Saaf) नावाचे बुरशी नाशक आणि अजून त्यात आपल्याला 13.40.13 किंवा बोराँन घ्यायचे आहे. समजायला सोपे जावे म्हणून पुढे सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे. ईमामेक्टीन + गोदरेज डबल + साफ + 13.40.13 किंवा बोराँन. अशी ही फवारणी असणार आहे. ही फवारणी घेत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. ते पुढे पहा.

फवारणी करतांनी घ्यायची काळजी ? 
  • फवारणीसाठी स्वच्छ पाणी घ्यावे.
  • स्टिकर फवारा (मित्रांनो, सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे.
  • अशा वातावरणात फवारणी केल्यास फवारलेलं औषध,
  • धुवून जाण्याची अधिक भीती असते त्यासाठी त्यात स्टिकर फवारावे

अशा पद्धतीने फवारणी केल्यास सोयाबीनला भरमसाठ फुले लागतील आणि नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ झालेली दिसेल. महत्वाचे :- कोणतीही फवारणी करत असताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घेणे.

How to Increase Soybean Yield

कुकुट पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर येथे क्लिक करून 

Source :- Agro India Guru


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !