Imd Weather Forecast | Imd Satellite | मान्सून लांबणीवर ? शेतकऱ्यांनी पेरणी घाई नको लगेच पहा अंदाज

Imd Weather Forecast :- नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची माहिती भारतीय हवामान खात्याकडून मान्सून बाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स (weather today) समोर येत आहे.

तर मान्सून राज्यात कधी दाखल होईल त्यासाठीची मान्सूनची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. हवामान विभागाचा नवीन अंदाज काय आहे संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर लेख संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा.

Imd Weather Forecast

गेल्या काही दिवसात राज्यात विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्याचबरोबर तापमान काही प्रमाणात कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तर अजूनही राज्याला मान्सूनची प्रतीक्षा आहे.

तर राज्यात मान्सूनचं आगमन केव्हा होईल त्याबाबत हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेऊ. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात मान्सून आगमन लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून ची रेषा गुरुवारी बंगालच्या उपसागरात पुढे सरकली. आणि त्याचबरोबर मिझोराम, नागालँड, आणि मणिपूर येथील आणखी काही भागांमध्ये मान्सून पोहोचला. मात्र पश्चिम किनारपट्टीवर त्याची प्रगती अद्यापही झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीवर मान्सून हा अधिक सक्रिय होईल. असे गुरुवारी दिलेल्या पावसाच्या विस्तारीत श्रेणीच्या अंदाजावरून याठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. आणि या संदर्भात अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे.

मान्सून हवामान अंदाज लाईव्ह 

या दरम्यान महाराष्ट्रात 2 टोकाच्या वातावरणाचा अनुभव येऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. मोसमी पाऊस येत्या दोन दिवसांमध्ये मध्य भारताच्या काही भागांत पर्यंत पोहोचणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तर राज्यात 7 ते 10 जून दरम्यान मान्सूनची पावसाचे आगमन होऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र चार आठवड्यांसाठी दिलेल्या पावसाची विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार नऊ जून पर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सक्रिय असल्याचे स्पष्ट होत नाही.

त्यामुळे 10 ते 16 च्या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीवरील सागरी वाढलेले दिसते. आणि कोकण तसेच मध्य महाराष्ट्राचा काही भाग येथे मान्सून सक्रिय असल्याचे दिसत आहे. तर अशाप्रकारे मान्सूनचा प्रवास असणार आहे.

हवामान अंदाज आजचा कसा राहील ? 

तर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून मराठवाडा आणि विदर्भ मध्ये येऊ शकते. या काळात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात फारच जोरदार पावसाची शक्यता नाही असे पूर्वानुमानामध्ये मध्ये दिसत आहे.

येत्या पुढील काही दिवसात राज्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर त्याचबरोबर दुसरीकडे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.

उद्याचा हवामन अंदाज लाईव्ह 

तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्ये अनुमान आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, येथे शुक्रवारी तसेच रविवारी. सोमवारी अहमदनगर, पुणे, नांदेड, हिंगोली, लातूर उस्मानाबाद येथे गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

तर विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, वर्धा येथे शुक्रवारी आणि शनिवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि विदर्भात मान्सून आगमन होईपर्यंत तापमान चढे असण्याची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment