IMD Weather Forecast :- दोन दिवस दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यतील
अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची रिपरीप पाहायला मिळते. आएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या ३-४ तासांमध्ये पालघर, ठाणे, रायगड या
जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात सकाळपासूनच, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
IMD Weather Forecast
पुढच्या ३-४ तासांमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही तास या भागांमध्ये वादळी
वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्या आणि खबरदारी घ्यावी असाच अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान ३-४ तासांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकाणी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वादळीवाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुढचे ४ तास
नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी हवामानाचा अंदाज घ्यावा असाही इशारा देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांनीही हवामानाच्या अंदाजानुसार शेतीच्या कामांना सुरुवात करावी अशी माहिती आहे.
📑 हे पण वाचा :- शेतात पोल,डीपी आहे का ? मग मिळवा 5 हजार रु. जाणून घ्या कायदा लगेच