Jamin Kharedi Anudan Yojana | शेतजमीन खरेदी 100% अनुदान योजना 2022

Jamin Kharedi Anudan Yojana : नमस्कार सर्वांना शेतमजूर कुटुंबासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतमजुरांना शंभर टक्के अनुदानावर 2 एकर बागायती किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन (Jamin Kharedi Yojana) 100% टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना दिली जाते. आणि या योजनेसाठी या जिल्ह्याकरिता अर्ज सुरू झालेले आहेत. आपण 100% टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी या योजनेचा अर्ज करू शकतात. तरी या योजनेचा अर्ज कोणती शेतमजूर अर्ज करू शकता यासाठी कागदपत्रे पात्रता काय आहेत. अर्ज कोठे सादर करायचा आहे ही संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा.

Jamin Kharedi Anudan Yojanaशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक

शेत जमीन खरेदी अनुदान योजना 2022

दारिद्रय रेषेखालील भुमिहीन अनुसुचित जाती व नवबौध्द शेतमजुर कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे. व त्यांचे राहणीमानात सुधारणा व्हावी, त्याचे शेतमजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे. या उदे्शाने शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना (Jamin Kharedi)  राबविण्यात येत आहे. ही  योजना सन 2004 पासुन सुरु केली आहे.

गाय/म्हैस गोठा 100% अनुदानावर नवीन योजना सुरु GR आला येथे पहा 

जमीन खरेदी अनुदान 2022 

या योजनेद्वारे अनुसुचित जाती व नवबौध्द भुमीहीन शेतमजुरांना 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीताखालील जमीन. शासकीय दराने खरेदी करुन शासनाकडून 100 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यांत येते. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान ही महत्वकांक्षी योजना राज्यामध्ये सन 2004-05 पासून कार्यान्वित केली असून दारिद्रे रेषेखालील भुमीहीन शेतमजुरांना कुटुंबाचा उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्याने अनुसुचित जाती व नवबौध्द भुमीहीन शेतमजुरांना शासकीय अटी पूर्ण करीत असल्यास निवड समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीता खालील जमीन शासकीय दराने खरेदी करुन शासनाकडून 100 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यांत येते.

शेळी पालन शेड | कुकुट पालन शेड 100% अनुदान योजना 2022 सुरु संपूर्ण माहिती येथे पहा 

शेतजमीन खरेदी अनुदान पात्रता 

या योजनेतंर्गत लाभार्थी किमान 18 ते 60 वर्षे वयोगटातील असावा. तो दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेजमजूर असावा. भूमिहीन शेतमजूर, परित्यक्त्ता स्त्रिया यांना लाभार्थीच्या निवडीत प्राधान्यक्रम दिला जातो. महसूल व वनविभागाने ज्यांना गायरान व सिलीगंच्या जमीनीचे वाटप केले आहे. त्या लाभार्थी कुटूंबाना या योजनेचा लाभ मिळणार (Jamin Kharedi Anudan Yojana) नाही.

जमीन अनुदान योजना 2022 

खरेदी केलेली जमीन ही पती, पत्नीच्या नावे खरेदी केली जाते. भूमिहीन शेतमजूर, परित्यक्त्या स्त्रियांना त्यांच्या नावावर खरेदी करण्यात यावी. कोणत्या कारणास्तव  जमीन कोणत्याही  व्यक्तीला हस्तातंरित  करता येणार नाही. भूमिहीन लाभार्थींना  ही जमीन कोणत्याही परिस्थितीत विक्री करता येणार नाही.

अर्ज कुठे सादर करावा आपल्या जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण ऑफिस

शेत जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे
 • शेतजमीन पसंत बाबत लाभार्थ्यांचा १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र
 • मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
 • मतदान कार्ड
 • आधार कार्ड 
 • रेशन कार्ड
 • अर्ज विहीत नमुन्यात पासपोर्ट फोटोसह
 • रहिवाशी दाखला
 • भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार दाखला
 • लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र
 • वय ६० वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला
 • अर्जदाराने अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र

सादर योजनेचे अर्ज व कोणत्या जिल्ह्यात हे अर्ज सुरु आहे.

हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहिती वर पहा संपूर्ण माहिती 


📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 शेत, मालमता संपत्तीवर मुलींचा अधिकार किती ? :- येथे पहा 

Leave a Comment