Jan Dhan Account Benefits | जनधन खाते धारकांना 2.30 लाख रु. लाभ मिळतो तुम्हाला मिळेल का ? असे पहा लगेच

Jan Dhan Account Benefits : नमस्कार सर्वाना जनधन खाते धारकांना अतिशय आनंदाची बातमी आहे. देशातील तसेच राज्यातील जनधन खाते धारकांना जनधन योजने अंतर्गत 2 लाख 30 हजार रुपये ची सुविधा मिळणार आहे. आणि याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

Pm Jan Dhan Yojana

जनधन खात्यावर मोफत मिळतंय सव्वा दोन लाखाची जबरदस्त सुविधा तुम्हाला मिळणार का ? हा लाभ. पीएम जनधन योजनेला (Pm Jan Dhan) योजनाला 7 वर्षे पूर्ण झाले. या सरकारी योजनेचा लाभ सर्व सामान्यांना आवडली हो लोकप्रिय झाली आहे.

जनधन धारकांनाची एकूण संख्या 43 कोटीच्या वर गेल्याची माहिती सध्या समोर येत आहे. आणि मोदी सरकारची ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी लोकप्रिय ठरलेले आहे. आणि योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा म्हणजेच 2 लाख 30 हजार रुपये सुविधा कोणती आहेत जाणून घेणार आहोत.

Jan Dhan Account Benefits 

प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे नागरिकांसाठी बँकेचे दरवाजे उघडले गेले आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर प्रत्येकाला पासबुक आणि रूपे कार्डची नवीन सुविधा देण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर खातेधारकाला स्वस्त विमा, पेन्शन, ही सुविधा देखील दिली जाते.

जनधन खाते धारकांना एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. तर हा लाभ नेमका कसा दिला जातो. जनधन खाते उघडल्यानंतर अपघात विमा संरक्षण दिले जाते. खातेदारांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30 हजार रुपयेचा सामान्य विमा दिला जातो. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला 2 लाख रुपये दिले जातात.  

जनधन खाते कसे काढायचे

अशा प्रकारे जनधन खाते धारकांना एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो. योजनेचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जातात मात्र आपण खाजगी बँकेमध्ये देखील खाते उघडू शकता. तुमचे दुसरे सेविंग खाते असल्यास तुम्ही ते जनधन खाते मध्ये ट्रान्सफर करू शकतात.

आपलं अकाऊंट थेट जनधन खात्यामध्ये बदलू शकतात. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय दहा वर्षे पेक्षा जास्त आहे. तो जनधन खाते उघडू शकतो, त्याला जनधन योजनेचा लाभ मिळू शकतो.

जनधन खाते साठी लागणारी कागदपत्रे

ई-केवायसी अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी सर्वप्रथम केली जाते.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • मनरेगा जॉब कार्ड

या कागदपत्रांचा वापर करून जनधन खाते उघडता येते यामध्ये मुख्यत्वे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

जनधन खाते कोणत्या बँक मध्ये उघडावे 

जनधन अकाउंट कसे उघडावे/खोलावे जनधन खाते उघडण्यासाठी सरकारी बँका किंवा खासगी बँकेमध्ये पण उघडू शकता. सरकारी बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इत्यादी बँकेमध्ये खाते उघडू शकता तसेच खाजगी बँकेमध्ये देखील आपण खाते उघडू शकता.

जसे कर्नाटक बँक, इंडियन बँक, फेडरल बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसी बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये देखील आपण खाते उघडू शकतात.


📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 34 जिल्ह्यातील :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !