Jilha Parishad Anudan Yojana : आजच्या या लेखा मध्ये आपण जिल्हा परिषद विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी आज जाणून घेणार आहोत, की कोणत्या योजनेसाठी किती अनुदान दिले जाणार
आहे व त्यासाठी आपल्याला अर्ज (फॉर्म) कसा भरायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे. सदर योजना ही पुणे जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत आहे, जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
पुणे जिल्ह्यातील लाभार्थी पात्र
- पुणे जिल्हा परिषद अंतर्गत महिला बाल कल्याण विभाग अंतर्गत सदर योजना
- पिठाची गिरणी
- 2) शिलाई मशीन
- 3) सोलर हिटर
- 4) खाद्य तेल घाणा
- सदर योजनेचा अर्ज:- Download link
सदर योजनेसाठी कागदपत्रे
- पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड
- वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- उत्पन्न दाखला
- विशेष घटक योजना किंवा आदिवासी उपयोजना योजनेतून लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्यांच्या सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला.
- ग्रामसभेव्दारे लाभार्थी निवड केलेचा ठराव.
- विद्युत पुरवठा असलेबाबत वीज बिलाची मागील तीन महिन्यापैकी एका महिन्याची झेरॉक्स प्रत.
- शिलाई मशीन वस्तूचा त्याभ घ्यावयाचा असल्याम स्थानिक/नोंदणीकृत संस्थेतुन शिलाई चे प्रशिक्षण घेतलेचे प्रमाणपत्र
- लाभार्थ्यांचे आधारकार्डची स्वंयसाक्षाकित प्रत
- विधवा परित्यक्ता/निराधार असलेबाबतचे स्वंय घोषणापत्र
- अन्य योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचे स्वंय घोषणापत्र
- अपंग लाभार्थी असल्यास अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र (किमान 40% किंवा त्या पेक्षा जास्त)
- कोवीड-19 काळात विधवा झालेल्या महिलांचे अर्जा बाबत-पतीचे मृत्युचा दाखला जोडावा.

Jilha Parishad Anudan Yojana
महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत सदर योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ई. ७ वि ते १२ वी पास मुलीना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज सुरू
अर्ज फॉर्म :- Download Link
अर्जासोबत कागदपत्रे जोडवावी
- लाभार्थ्याने सन 2021-22 या वर्षात एम एस सी आय टी, सी सी सी व समकक्ष असणारे प्रशिक्षण
पुर्ण केलेले असावे. - पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड किंचा वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- आतील असलेचा सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्न दाखला.
- शैक्षणिक आर्हता प्रमाणपत्र आवश्यक
- संगणक कोर्सचा प्रवेश अर्ज पावती आवश्यक
- 2021-22 या वर्षात संगणक प्रशिक्षण
- (MSCIT/CCC किंवा समकक्ष असणारे प्रशिक्षण) पास झालेचे प्रमाणपत्र
- अपंग लाभार्थी असल्यास अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र (किमान 40% किंवा त्या पेक्षा जास्त)
- आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकीत प्रत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष योजना
सदर योजनांतर्गत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत म्हणून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज फॉर्म:- Download Link
अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडवावी
- पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड किंवा वार्षिक उत्पन्न रू.1,20,000/-आतील असलेचा सक्षम प्राधिकान्याचा उत्पन्न दाखला.
- सन 2020-20२१ मध्ये ई. 10 वी/12 वी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळाविलेल्या गुण पत्रिकेची प्रत
- पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेबाबतचे महाविद्यालयाचे पत्र/प्रवेश अर्जाची पावती
- आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकीत प्रत.