Jsy Scheme Benefits Marathi | जननी सुरक्षा योजना माहिती मराठी | जननी सुरक्षा योजना फायदे | या योजनेत विवाह झालेल्या महिलांना 3400 रु. मिळणार असा घ्या लाभ लगेच

Jsy Scheme Benefits Marathi :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये आपण जननी सुरक्षा योजना याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

विवाह झालेल्या महिलांना या योजनेअंतर्गत 34 रुपयांचा लाभ दिला जातो. तर हा कोणत्या विवाह झालेल्या महिलांना देण्यात येतो. त्याचबरोबर ही योजना नेमकी काय ? या योजनेचा लाभ कसा घेता येईल.

यासाठी अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे कोणती लागतात याबाबत संपूर्ण माहिती म्हणजेच जननी सुरक्षा योजनेचा लाभ कसा घेता येईल याबाबत माहिती जाणून घेऊया.

Jsy Scheme Benefits Marathi

शासन परिपञक क्रमांक जेएसवाय/२००६/प्र.क्र.१७५/ कु.क.३ दि. २२ डिसेंबर २००६ नुसार जननी सुरक्षा योजना राबविली जाते. या योजनेमध्‍ये ग्रामीण व शहरी भागातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्‍यांना लाभ दिला जातो.

केंद्रशासनाच्‍या परिपञकानुसार दिनांक ८ मे २०१३ पासून लाभार्थ्‍यांचे वय व अपत्‍यासंबंधीच्‍या अटी शिथिल करण्‍यात आलेल्‍या आहेत. राज्‍यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील.

अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्‍या कुटुंबातील माता मृत्‍यु व अर्भक मृत्‍युचे प्रमाण कमी करणे. आणि या महिलांचे आरोग्‍य संस्‍थेत प्रसुतीचे प्रमाणात वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

जननी सुरक्षा योजना मराठी

 • राज्‍यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसुचित जाती व जमाती
 • या कुटुंबातील सर्व गरोदर महिलांना शासकीय व खाजगी मानंकित
 • आरोग्‍य संस्‍थेतील कोणत्‍याही बाळंतपणानंतर लाभ देय आहे
 • तर फक्‍त दारिद्रयरेषेखालील गरोदर महिलेला घरी बाळंतपणानंतर लाभ देय आहे.
 • लाभार्थीकडून जननी सुरक्षा योजनेकरिता आवश्‍यक असलेली कागदपञे प्राप्‍त करुन घेणे.
 • विहीत नमुन्‍यातील जेएसवाय कार्ड सर्व आवश्यक माहिती भरुन लाभार्थीस देणे.
 • पाञ लाभार्थीस प्रसुतीपूर्व तीन तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व लोहयुक्‍त गोळया मिळवून देणे
 • पाञ जेएसवाय लाभार्थीस शासकीय आरोग्‍य संस्‍थ्‍ोत
 • शासन मानांकित खाजगी आरोग्‍य संस्‍थेत प्रसुती करिता प्रवृत्‍त करणे.
 • पाञ जेएसवाय लाभार्थीस बॅंकेत खाते उघडून घेण्‍यासाठी मदत करणे

जननी सुरक्षा योजना फायदे

ग्रामीण भागातील जेएसवाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगी आरोग्‍य संस्‍थ्‍ोत प्रसुत झाली. तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ७००/- लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणार.

धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो. शहरी भागातील जेएसवाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगी आरोग्‍य.

संस्‍थ्‍ोत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ६००/-लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़-या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.

जननी सुरक्षा योजना काय आहे व लाभ 

ग्रामीण व शहरी भागातील फक्‍त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्‍यांची प्रसुती घरी झाल्‍यास अशा लाभार्थ्‍यांस रुपये ५००/- लाभ प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.

जेएसवाय पाञ लाभार्थीची सिझेरियन शस्‍ञक्रिया करणे आवश्‍यक असल्‍यास लाभार्थीस रुपये १५००/- लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.

जननी सुरक्षा योजना कागदपत्रे

जीएसवाय (जननी सुरक्षा योजना) या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कागदपत्रे कोणती आवश्यक आहे. हे कागदपत्रे आपल्याला खाली देण्यात आलेले आहे. ते कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे, कागदपत्रे पहा पुढीलप्रमाणे.

अर्जदाराचे आधार कार्ड, बीपीएल रेशन कार्ड, पत्त्याचा पुरावा, रहिवासी दाखला, जननी सुरक्षा कार्ड असणे आवश्यक आहे. सरकारी दवाखाने ने दिलेले डिलिव्हरी प्रमाणपत्र आवश्यक आहे.  

बँक खाते पासबुक आवश्यक आहे. त्याचबरोबर बँक खात्याशी लिंक असलेले मोबाईल नंबर.आवश्यक आहे. किंवा आपले खाते ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे.

आधार लिंक असणे आवश्यक आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो आपल्याला लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

📝 हे पण वाचा :- sbi बँक देणार शेती खरेदी करिता 85% कर्ज जाणून घ्या कोणाला ते लगेच पहा 

आशा कार्यकर्तीस मिळणारे लाभ

 • ग्रामीण भागातील पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती शासकीय अथवा खाजगी मानंकित आरोग्‍य संस्‍थेत करण्‍यासाठी लाभार्थीस प्रवृत्‍त केल्‍यास एकूण रुपये ६००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्‍हणून अदा करण्‍यात येते.
 • त्‍यामधील रुपये ३००/- प्रसूती पूर्व दयावयाच्‍या सेवा दिल्‍याची खाञी केल्‍यावर आणि रुपये ३००/- आरोग्‍य संस्‍थ्‍ेात प्रसुतीसाठी प्रवृत्‍त केल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर देण्‍यात येते.
 • शहरी भागात पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्‍य संस्‍थेत करण्‍यासाठी लाभार्थीस प्रवृत्‍त केल्‍यास एकूण रुपये ४००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्‍हणून अदा करण्‍यात येते.
 • त्‍यामधील रुपये २००/- प्रसूती पूर्व दयावयाच्‍या सेवा दिल्‍याची खाञी केल्‍यावर आणि रुपये २००/- आरोग्‍य संस्‍थ्‍ेात प्रसुतीसाठी प्रवृत्‍त केल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर देण्‍यात येते.

📝 हे पण वाचा :- सुकन्या समृद्धी योजना आता मिळणार जास्त लाभ जाणून घ्या माहिती 

सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था

ग्रामीण भागात :- उपकेंद्रे, प्र‍ाथमिक आरोग्‍य केंद्रे, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये. जिल्‍हा स्‍ञी रुग्‍णालये, जिल्‍हा रुग्‍णालये, आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्‍णालये

शहरी भागात:- वैदयकीय महाविदयालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्‍या कार्यक्षेञतील नागरी आरोग्‍य केंद्रे. नागरी कुटुंब कल्‍याण केंद्रे व त्‍यांच्‍याकडील इतर रुग्‍णालये आणि शासन अनुदानित रुग्‍णालये.

JSY योजना गाईडलाईन व GR 

जननी सुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणारे महिलांना लाभ तसेच या योजनेचा गाईडलाईन्स. तसेच या योजने संबंधित शासनाचे अधिकृत माहिती आहेत हे आपल्याला खाली देण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती अधिकृतपणे खाली देण्यात आलेले आहे की आपण पहा.

केंद्र सरकार परिपत्रक येथे पहा आणि राज्य शासन माहिती येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *