Jyotiba Phule Information | Jyotiba Phule Biography | महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती मराठीत, जन्म, शिक्षण, कार्य, मृत्यू, वाचा सविस्तर

Jyotiba Phule Information :-आज या लेखामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन परिचय माहिती जाणून घेणार आहोत. अर्थातच यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

महात्मा ज्योतिराव फुले यांची प्राथमिक माहिती अगोदर जाणून घेऊया. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला होता.

ज्योतिबांच्या वडिलांच्या नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. ज्योतिबांचे आजोबा शेरीबा गोरे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असे.

यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर मुलांच्या व्यवसायामुळे गोरे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले.

Jyotiba Phule Information

याच नंतर आजोबांच्या मृत्यूनंतर ज्योतिबाचे काका रानोजीनी सदरील 35 एकर जमीन हडप केली, त्यामुळे नंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाला याचा व्यवसाय करू लागले. त्यांचा मूळ गाव कटगुणू तालुका खटाव

जिल्हा सातारा हे होते. आणि त्यानंतर महात्मा फुले हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली होती. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली होती.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू

सन 1887 मध्ये ज्योतिराव फुले यांचा पक्षघाताचा आजार झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंची मध्यरात्री दोन वाजता पुणे येथे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले.

अंत्ययात्रे वेळी जो टिटवे धरतो, त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले. आणि त्यांना आणि ज्योतिरांचा दत्तक पुत्र यशवंतांना विरोध करू लागले.

यावेळी सावित्रीबाई धैर्यने पुढे आल्या स्वतःचे टिटवे धरले अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या. आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवला अग्नी यांनी दिला.  यशवंतराव विधवेचा मुलगा असल्याने त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हते.

जेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी 4 फेब्रुवारी 1819 रोजी विवाह यशवंताचा विवाह करून दिला. यशवंत व राधा यांचा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह आहे.

Jyotiba Phule Information

APJ Abdul Kalam Biography In Marathi | डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती | अब्दुल कलाम यांचे विचार

महात्मा ज्योतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण ?

ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव कटगुणू सातारा जिल्ह्यात होते. त्याच गावी महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला होता. आणि त्यानंतर ज्योतिराव केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.

आणि त्यानंतर त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमामधून झाल्यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.

इसवी सन 1842 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला.

बुद्धी अतिशय तल्लख असल्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड,तामिळ, गुजराती, ते भाषा येत असे. अशा प्रकारचा त्यांचा शिक्षण आणि बालपण होते.

Jyotiba Phule Information
Jyotiba Phule Information

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य

अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्रा. मिस फरांकडून प्रेरणा घेऊन, तीन ऑगस्ट 1948 रोजी ज्योतिबांनी पुण्यातील बुधवार पेठ तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.

पहिल्या दिवशी या शाळेत आठ मुली उपस्थित होत्या. महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनवले होते.

शुद्रासाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून ज्योतिबांना त्यांच्या पत्नीसोबत ग्रहत्याग करावा लागला. पुण्यातील गंजपेटीतील उस्मान शेख यांच्या वाड्यात मुक्काम केला होता.

महात्मा जोतिबा फुले कोण होते ? :-  समाज सुधारक, लेखक, विचारवंत
महात्मा फुले यांचा जन्म ? :- 11 April 1827
महात्मा फुले यांचे कार्य ? :-  अनेक कार्य त्यांनी केले 
महात्मा फुले यांचे मृत्यू ? :- 28 November 1890, Pune
महात्मा जोतिबा फुले पूर्ण नाव ? :- ज्योतिराव गोविंदराव फुले

महात्मा फुले यांचे कार्य

1850 – 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा तर 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठ तिसरी स्थळ त्यांनी स्थापन केली होती.

त्यानंतर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत भिडे यांच्या पाड्यात मुलींचे अजून एक शाळा सुरू केली होती. आणि त्याचबरोबर 1852  नेटिव्ह फीमेल स्कूल सभा पुना लायब्ररीची त्यांनी स्थापना केली होती.

19 मे 1852 रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठीत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार, गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षण अध्यपनासाठी नेमले होते.

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य

यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली होती.

त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे (सध्याचे डेक्कन कॉलेज) प्रा मेजर थॉमस  यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून ज्योतिबांचा जाहीर सत्कार.

यानंतर महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या काही मित्रांसोबत घेऊन, सप्टेंबर 1853 मध्ये महार, मांग, आदी लोकांना शिकवण्यासाठी “मंडळी” नामक संस्था देखील स्थापन केली होती.

यानंतर 1955मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली रात्र शाळा त्यांनी स्थापन केली होती. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा

1895 फुले यांनी वयाच्या 28 व्या वर्षी पुण्यात तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले. ही ज्योतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते.

28 जानेवारी 1863 रोजी पुणे येथे राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती. यानंतर पंढरपुरात ही अशा गृहाची स्थापना करण्यात आली होती.

पुणे येथे बालहत्या प्रतिबंध गृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे 1873 मध्ये याच मुलाला फुले दांपत्याने दत्तक घेऊन त्यांचं नाव यशवंत ठेवले.

यशवंत नंतर डॉक्टर झाला. त्यानंतर 1897 पुणे ते धनकवटी येथील दुष्काळ पिढीत विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला तसेच व्हिक्टोरिया अनाथ आश्रमांची स्थापना देखील केली होती.

महात्मा फुले यांचे दीनबंधू

विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथम बंद पडण्यासाठी तळेगाव, ढमढेरे, व ओतुर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला. 8 मार्च 1964 रोजी गोखले यांच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला.

त्याचबरोबर महात्मा फुले यांचे साहित्य महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.

समाजाचे मुखपत्र म्हणून “दीनबंधू” हे साप्ताहिक चालवले जाते. तुकारामांच्या अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले होते. जसे की गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्ण वर्णीयांना त्यांनी समर्पित केला.

Jyotiba Phule Information

महात्मा फुले समग्र वाङ्मय, २००६, आ. ६वी (सुधारित ६व्या आवृत्तीचे पीडीएफ इ-पुस्तक येथे डाउनलोड करा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा 

 

 

 

 

 

 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !