Kadba Kutti Zp Yojana :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची योजना सुरू झाली आहे. कडबा कुट्टी आणि सायलेज बॅग हे आता शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार आहे.
जिल्हा परिषद योजनेअंतर्गत या 2 योजना राबविण्यात सुरुवात झाली आहे. कोणत्या जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना सुरू झाली आहे? या योजनेसाठी किती अनुदान मिळेल?
अर्थात सायलेज बॅग आणि कडबा कुट्टी घेण्यासाठी किती अनुदान मिळेल काय आहे?. जिल्हा परिषद सेस फंड योजना सातारा ही संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया.
Kadba Kutti Zp Yojana
या योजनेचा लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने (डीबीटी) अंतर्गत देण्यात येत आहे. यापूर्वी 11 विविध योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. यासंबंधीतील अधिक माहिती जाणून घेऊया.
जिल्हा परिषदेच्या सेस अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना सोबतच जिल्हा परिषद कृषी विभागाने दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हा दिला आहे.
पशुधनाचा कार्यक्रम वापरासाठी मुरघास साठवून घेण्यासाठी सायलेज बॅग आणि कडबा कुट्टी योजना जिल्हा परिषदेचा ठराव समितीने मान्यता दिलेले आहे.
जिल्हा परिषद अनुदान योजना
या योजनेअंतर्गत म्हणजे दोन्हीही सायलेज बॅग आणि कडबा कुट्टी यासाठी 50% अनुदानावर राबवण्यात येत आहे. या योजनेत भाग घेण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत पंचायत समिती
कार्यालयात अर्ज सादर करावी अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर (सातारा) यांनी बाबत माहिती दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषद अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
📑 हे पण वाचा :- ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्डसाठी केवळ हे एकच कागदपत्र लागणार, पहा केंद्राचा निर्णय !
कडबा कुट्टी व सायलेज बॅग अनुदान योजना
आता अशा दुष्काळजन्य परिस्थितीवर जिल्हा परिषदेने या ठिकाणी मुरघास साठवणीसाठी सायलेज बॅग आणि कडबा कुट्टी या दोन्हींना मंजुरी दिली आहे.
आता जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी सायली जायची मदत होणार आहे सायलेज बॅग साठी अनुदान देण्यात येत आहे. अनुदान किती असेल तर जिल्हा परिषद योजनेअंतर्गत
निवड होणाऱ्या लाभार्थ्यांना 500 किलोग्राम मुरघास साठवणारी क्षमतेच्या अधिकाधिक 600 बॅगसाठी किमतीच्या 50% किंवा 1800 रुपये यापैकी कमी असेल इतक्या अनुदान दिले जाणार आहे.
📑 हे पण वाचा :- शेतकरी अनुदान योजना 50 पेक्षा जास्त योजना सुरु, भरा ऑनलाईन फॉर्म
सायलेज बॅग अनुदान योजना सातारा
कडबा कुट्टीसाठी लाभार्थ्यांना 2Hp विद्युत चलित कडबा कुट्टीसाठी 50% म्हणजेच 13 हजार रुपये यापैकी जी कमी असेल ते अनुदान मिळणार आहे. असे माईनकर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.
अशा पद्धतीने हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अशा पद्धतीने जिल्हा परिषद सातारा अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. सदर बातमी व योजना ही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे.
याची सर्व शेतकरी किंवा लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता अशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा सेस फंड अंतर्गत या सायलेज बॅग आणि त्यानंतर कडबा कुट्टीसाठी अनुदान देण्यात येत आहे. अशी माहिती ॲग्रोवनच्या बातमी वेबसाईटवर देण्यात आलेली आहे धन्यवाद…….