Kanda Bajar Bhav Aajche :- आता कांद्याला 4000 रुपये प्रति क्विंटल दर या बाजारात मिळाला आहे. याचे संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 8 ते 10 या महिन्यापासून बाजारात कांद्याला तेजी वाढत चालली आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेर पासून कांदा दरात घसरण होण्याची सुरुवात झाली होती. मात्र राज्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सह जवळपास सर्वच बाजार कांदा बाजारात कांद्याला मात्र दोन ते तीन हजार रुपये प्रति किलो असा भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता येत नव्हता.
Kanda Bajar Bhav Aajche
यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराज होती परंतु आता जुलै महिन्यात कांद्यात दरात वाढ झालेली आहे. आणि गेल्या आठ-दहा दिवसापासून कांद्याला जास्त प्रमाणात विक्रमी दर हा मिळाला सुरुवात झालेली आहे. आज कांदा दर पाहिलं तर कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे.
4000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर पोहोचला आहे. आता सरासरी बाजार भाव 2550 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत आणि राज्यातील अनेक महत्त्वाचे बाजार कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटन ते 2500 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
📑 हे पण वाचा :- शेततळे अनुदान योजनेत वाढ आता 30×30 साठी एवढं अनुदान मिळेल, त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म ही घ्या डायरेक्ट लिंक मिळवा अनुदान !
आजचा कांदा बाजार भाव
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणी 15 तारखेला 348 क्विंटल आवक कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 4000 आणि सर्वसाधारण 2500 रुपये इतका दर मिळालेला आहे.
त्याच पाठोपाठ संगमनेर उन्हाळी कांद्यासाठी 7950 क्विंटल आवक कमीत कमी 300 रुपये दर, जास्तीत जास्त 3 हजार 101 रुपये, आणि सर्वसाधारण 1700 रुपये दर मिळत आहे. अशाप्रकारे कांद्याला बाजार भाव सध्या मिळत आहे. शेतकरी आता आनंदाची बातमी, आणि कांद्याला असा दर मिळवा शेतकऱ्यांचे मन आहेत.
