Kanda Chal Anudan Yojana :- शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ आवश्यक आहे. शेतकरी कांदा चाळ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा पीकाचे नुकसान होत असतं.
याचा विचार करता सरकारने कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत सर्वच शेतकरी या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता यासाठी कागदपत्रे, पात्रता, काय ? किती मेट्रिक टनापर्यंत आपल्याला अनुदान दिले जाणार आहे.
आपल्याला जमिनीचे किती क्षेत्र हे आवश्यक आहे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज आपल्याला कुठे भरायचा कसा भरायचा त्या संदर्भातील व्हिडिओ देखील आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
Kanda Chal Anudan Yojana
- 7/12 उतारा
- आधार कार्डाची छायांकीत प्रत
- आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
- संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी)
- विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-2)
- ८- अ प्रमाणपत्र
- खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन किंवा बिल
📑 हे पण वाचा :- वन्य प्राणी पळवून लावण्यासाठी जुगाड | शेतात डुक्कर, अन्य प्राणी येउच द्यायचं नाही ना ? मग हे काम करा लगेच
कांदा चाळ अनुदान योजना पात्रता
- 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी १ हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 M. टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असावे.
- अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक कांदा पिकाची नोंद असणारा सातबारा उताराची प्रत आणि 8 अ उतारा हा महाडीबीटी पोर्टल उपलोड करावा.
- लाभार्थींनी कांदा चाळ बांधण्यापूर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा लागणार आहे. कांदा चाळ ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठी अर्ज आहे.
कांदा चाळ ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र
अर्ज कोठे करावा | शेतकरी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकतात |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
महाडीबीटी पोर्टल बद्दल माहिती हवी असल्यास | येथे क्लिक करा |
कांदा चाळ अनुदान योजना?
यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ची सोडत होणार असून. आपल्या Kanda Chal Anudan Yojana साठी आपले कृषी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे आपल्या थेट शेतामध्ये येऊन पाहणी करतील. कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागणार आहे.
त्याचबरोबर काम झाल्यानंतर जिओ टॅगिंग ने अर्जदाराचा कांदाचाळी चा फोटो देखील आपल्याला जोडावे लागणार आहे. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक नमुने खालील प्रमाणे असतात.
कांदा चाळ अनुदान योजना क्षमता
शेतकऱ्यांना या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी अनुदानाचा लाभ दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांना 100 मेट्रिक टना पर्यंत तर सहकारी संस्थांसाठी 500 मॅटिक टनापर्यंत चाल बांधण्याची तरतूद या योजनेत आहे.
कांदा चाळ अनुदान किती ?
5, 10, 15, 20 आणि 25 मीट्रिक टन क्षमतेच्या यापैकी कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50% टक्के. किंवा कमाल रु.3500 प्रति मीट्रिक टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य (अनुदान) देय राहील.