Kapus Bond Ali Niyantran :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांना तुम्ही देखील कापूस लागवड केली असेल आणि कापसावर बोंड अळी (Gulabi Bondali) आली असेल तर बोंड अळीला रोखणेसाठी किंवा नष्ट करण्यासाठी कोणती सोपे उपाय आहेत हे आज लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कॉटन बोंड अळी ही कापसांवरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असते. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होत असते. आणि याच बोंड अळीला रोखण्यासाठी कोणते उपाय आहे ? हे आज लेखाच्या माध्यमातून आपण पाहूयात.
Kapus Bond Ali Niyantran
यंदा कपाशी लागवड एकाच वेळेला न होता टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात झाली. त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत, असल्यामुळे आणि याशिवाय ढगाळ वातावरण असल्याने गुलाबी बोंड (बोंड अळी नियंत्रण) अळीचा संकट येण्याची शक्यता आहे.
म्हणून कपाशीच्या पिकात कामगंध सापळे (Kamgandh Saple) लावण्याची हीच योग्य वेळ असल्यासच सांगितलं जात आहेत. यापासून आता निरीक्षण करून गुलाबी बोंड अळीला रोखता येणे श्यक्य आहेत. हे कामगंध सापळे कसे लावायचे याशिवाय बोंड अळीचे जैविक आणि रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसं करायचं याची माहितीच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गुलाबी बोंड अळी / Gulabi Bondali Upay
यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. कशा पद्धतीने आपल्याला बोंड अळी रोखता येते ? यासाठी काय उपाय करायचे आहे ? ही माहिती संपूर्ण जाणून घेऊया. गुलाबी बोंड अळी आणि बोंड अळी कपाशीवर मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
कारण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. कपाशीची एकाच वेळी लागवड न झाल्यामुळे हा गुलाबी बोंड आळी वाढण्यासाठी शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
📑 हे पण वाचा :- सोयाबीन पिकांचे उत्पादन वाढवायचे ? असे वाढवा उत्पादन योग्य आणि सोप्या खत व्यवस्थापनातून वाचा सविस्तर !
Gulabi Bondali / कपशी बोंड आळी
यासाठी तुम्हाला घरगुती हे उपाय आणि त्याचबरोबर कृषी विभागाकडून काही महत्त्वाचा सल्ला या बोंड आळी रोखण्यासाठी किंवा याच्यावर उपाय म्हणून माहिती खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये दिली गेली आहेत. तुम्हाला संपूर्ण पाहून घ्यायचा आहे.
त्याप्रमाणे तुमच्या कापशीवर उपाय करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही कपाशीवरील बोंड अळी, किंवा गुलाबी बोंड अळी नियंत्रण रोखण्यासाठी उपाय आहेत. आधिक माहितीकरिता खालील व्हिडीओ पाहू शकता.
गुलाबी बोंड अळी नियंत्रण व माहिती pdf
बोंडअळी उपाय योजना माहिती मराठी
- प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळ्यांच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी २५ सापळे लावावेत.
- अळीच्या प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीसाठी ट्रायेकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी कीटकाच्या अंड्याचे एकरी २ ते ३ कार्ड फुलोरा व बोंडअवस्थेत पिकावर लावावेत जेणेकरून अंडी अवस्थेत बोंडअळीचा नाश होईल.
- शेतात प्रती कामगंध सापळा ८-१० पतंग सलग ३ रात्री किंवा ५ ते १० टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे, आढळल्यास ही किडीची आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. ही पातळी ओलांडल्यानंतर प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन ९.५ झेडसी ४ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३० अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६० हे किडकनाशक ५ मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- कपाशीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी व्यवस्थापन करावे असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. संजोग बोकन यांनी केले आहे.
📑 हे पण वाचा :- तुम्ही खरेदी केलेले खते डुप्लिकेट तर नाही ? अन्यथा पिकं जातील !, ही ट्रिक वापरून लगेच चेक करा खत बनावट की खरे ? वाचा ही माहिती तात्काळ !