Kapus Tannashak Konte Ahe :- शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आज जाणून घेणार आहोत. कापसाच्या उभ्या पिकांमध्ये तुम्ही हे तणनाशक वापरू शकता. आणि याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो. या तणनाशकाला कापसामध्ये कसं वापरायचं आहे ? याची सविस्तर माहिती या
लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कापूस पिकाची लागवड केल्यानंतर कापसाचे पिकात तण फार मोठ्या प्रमाणात उगवण होते. आणि त्याची जी काही खुरपणी, या खुरपणीसाठी मोठ्या प्रमाणात तुमचा वेळ आणि पैसे खर्च या वाढत असतो.
Kapus Tannashak Konte Ahe
आज अशा तणनाशकांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. ज्याच्या फवारणीनंतर त्यांची तण पूर्ण नाही होणार आहेत. कपाशी पिकाची चांगली वाढ होईपर्यंत तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. पण एखाद्या कपाशी मोठी झाल्यानंतर जमीन झाकून जाते. आणि त्यानंतर सुरुवातीच्या 50 ते 60 दिवसापर्यंत कपाशीचे पीक तन मुक्त होत
असते. त्यासाठी कोणते तणनाशक वापरता येते, याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आता तननाशक नियंत्रण मिळवण्यासाठी जमिनीची मशागत करणे गरजेचे आहे. नांगरणी व खुरपणी, बैलपाळी तणनाशक तणाचे जुने अवशेष शेताच्या बाहेर काढल्यानंतर हे संपूर्ण तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

कापूस पिकावर तणनाशक
या तणनाशकांमुळे जे काही कपाशीतील तण आहे हे तुम्ही संपूर्ण नाहीसे करू शकतात. तुम्ही उभ्या कापूस पिकांमध्ये खालील दिलेल्या कोणतेही एका तणनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. फवारणी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती व
कृषी सेवा केंद्रात जाऊन किंवा त्यांना विचारून फवारणी करावी पिकांना नुकसान झाल्यास त्याला जवाबदार वेबसाईट किंवा लेखक राहणार नाही ही केवळ माहिती देण्यात आली आहेत. हे तणनाशक कसे वापरायचं ? हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

✅ हेही वाचा :- ई पीक पाहणी 2.0.11 व्हर्जन | ई पीक पाहणी App चे नवीन व्हर्जन लॉन्च आता या पद्धतीने करा ई पीक पाहणी अन्यथा ?
तणनाशकचे नाव | कापूस तणनाशक फवारणी कधी करावी ? | किती लिटर पाण्यात किती तणनाशक टाकावे ? | |
पायरिथिओबॅक सोडियम 10% EC | कपाशी पीक जेव्हा 20 ते 30 दिवसाचे झाल्यानंतर या तणनाशकाची फवारणी | कपाशीसाठी 12.5 ML ते 15 ML प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी | |
बायर घासा 500 मिली/ पायरिथिओबॅक सोडियम 6% + क्विझालोफॉप इथाइल 4% या तणनाशक | कापूस पीक 20 ते 30 दिवसा | 20 ते 25Ml प्रति दहा लिटरच्या पंपासाठी प्रमाण घ्यावे | |
धानुका तारगा सुपर (क्विझालोफॉप इथाइल 5% ईसी) 500 मि.ली | कपाशीचे पीक 30 ते 40 दिवसाचे असताना | 10 लिटर पंपासाठी 20ML हे प्रमाण घ्यावे | |
स्वीप पॉवर – ग्लुफोसिनेट अमोनियम हर्बिसाइड | पीक 20 ते 30 दिवसाचे असताना | दहा लिटर पंपासाठी 50-60ML प्रमाण | |
रासायनिक तणनाशकाची फवारणी केल्यानंतर किमान 4 ते 5 दिवस कोळपणी किंवा डवरणी करू नये | |||
रासायनिक तणनाशकाची फवारणी करताना कंपनीने अधिकृत सांगितलेले प्रमाणच वापरावे, यात कमी अधिक प्रमाण करू नये | |||
तणनाशकाची फवारणी कडक ऊन असताना टाळावी. पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये. | |||
सततच्या पावसाने खुरपणी, बैलपाळी ही आंतरमशागत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तननाशक वापरा. सदर तणनाशक हे कृषी सेवा केंद्र यांच्याकडून घ्यावे. आणि त्यांना याची सविस्तर विचारपूस करून कशी फवारणी करायची आहे ? केव्हा करायचे आहे ? याची माहिती घ्यावी. ही माहिती फक्त तुमच्या ज्ञानात भर पाडावी यासाठी देण्यात आलेली आहे. याची कोणतीही जबाबदारी लेखक किंवा वेबसाईट घेत नाही. |