Kharip Pik Vima Manjur | पिक विमा मंजूर यादी आली | पिक विमा जिल्हानिहाय यादी 

Kharip Pik Vima Manjur | पिक विमा मंजूर यादी आली | पिक विमा जिल्हानिहाय यादी 

Kharip Pik Vima Manjur | पिक विमा मंजूर यादी आली | पिक विमा जिल्हानिहाय यादी 

खरीप पिक विमा मंजूर 2021

नमस्कार सर्वाना, आजच्या या लेखा मध्ये आपण पिक विमा मंजूर झालेल्या जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत, तर या

जिल्ह्यामध्ये एकूण सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला त्या मध्ये 461 कोटी रु.खरीप पातील 6 पिकांसाठी

विमा मंजूर झाला आहे यामध्ये सोयाबीन,कापूस,तूर,मुग,उडीद, खरीप ज्वारी या पिकांसाठी विमा मंजूर झाला आहे व आज

पासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झाली संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या लेख मध्ये. 

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी झालेल्यां शेतकऱ्यांन पैकी जिल्ह्यात 7 लाख ३५ हजार शेतकऱ्यांना 6 पिकां साठी विमा

४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर करणायत आला आहे. आचार संहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी जमा होणारा विमा

मिळण्यास विलंब झाला होता. आता सोमवारपासून (दि.8) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती

जिल्हा जिल्हाधिकरी यांच्याकडून मिळाली. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे

खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मुग, खरीप ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा पावसाचे

प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या १३४% टक्के पावसाची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या

आवाहनानुसार जिल्ह्यातील 9 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पिक विमा भरला होता.

Kharip Pik Vima Manjur

या मुळे भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ४ लाखाच्या जवळ नुकसानीबाबत दावे दाखल झाले होते. याबाबत विमा कंपनीकडून सर्वेचे

काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

रविशंकर चलवदे यांनी वेळोवेळी कंपनी प्रतिनिधींशी समन्वय साधून शेतकऱ्यांना वेळेत विमा मंजूरीसाठी पाठपूरावा केला

होता या मुळे राज्यात सर्वातजास्त ४६१ कोटींचा विमा परतावा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला आहे व वाटप देखील सुरु झाले.

खरीप पिक विमा मंजूर यादी 2021

जिल्ह्यात मंजूर झालेल्या विमा शेतकऱ्यांना त्वरित द्यावा असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही दिले होते. दरम्यान

दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना ४६१ कोटी रुपयांचा मंजूर विमा शेतकऱ्यांना मिळावा असे नियोजन

होते. विमा परतावा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता. परंतु देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची

आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी विमा जमा करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. यानंतर बँकेला सुट्या

आल्या. या मुळे सोमवारपासून (ता. आठ) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा विमा परतावा

सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ही कार्यवाही दोन ते तीन दिवसात पूर्ण होणार आहे. डॉ. विपिन,

जिल्हाधिकारी,

तालुकानिहाय मंजूर विमा यादी 2021

  1. अर्धापूर २१७६३ – १८.८१ कोटी
  2. भोकर ३८०८१ – २५.२५ कोटी
  3. बिलोली ४७७६० – ३२.७६ कोटी
  4. देगलूर ६०३०३ – ३८.०४ कोटी
  5. धर्माबाद २३६५१ – १९.४५ कोटी
  6. हदगाव ६६०७४ – ६१.६२ कोटी
  7. हिमायतनगर १९४७७ – १५.१२ कोटी
  8. कंधार ९१०७९ ४१.७७ कोटी
  9. किनवट ११०८३ – ५.६९ कोटी
  10. लोहा ९५३४७ – ५३.०४ कोटी
  11. माहूर १०२११ – ९.५० कोटी
  12. मुदखेड २१२८६ – १४.३१ कोटी
  13. मुखेड १०४६९७ – ५०.०३ कोटी
  14. नायगाव ६२०७१ – ४०.९९ कोटी
  15. नांदेड ३६७२० – १९.५३ कोटी
  16. उमरी २६१९९ – १४.१९ कोटी

एकूण ७३५८११ – ४६१.०९ कोटी

📢 जमीन नावावर कशी करावी:- येथे पहा

📢 40+2 शेळ्या अनुदान योजना VIDEO:- येथे पहा  

संपूर्ण माहिती स्रोत:- ई-सकाळ

 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !