Kharip Pikvima 2021 List | 19 लाख शेतकऱ्यांना 1351 कोटी रु. बँक खात्यात जमा

Kharip Pikvima 2021 List : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची

बातमी आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आता कुठेतरी पिक विमा

शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल

केले आहे त्या शेतकऱ्यांना विमा जमा होण्यास सुरुवात झाले आहे.

खरीप पिक विमा महाराष्ट्र 2021

राज्यात दोन दिवसापासून पिकविमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये पाहिलं तर एकूण

30 लाख  शेतकऱ्यांना 1770 कोटीहून अधिक रकमेची वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2021-

22 चा पिक विमा हा दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. पण पीक विमा

कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विमा जमा होण्यास फार विलंब झाला  तर अखेर राज्य कृषिमंत्री

दादाजी भुसे यांनी गेल्या. आठवड्यात सात दिवसाचा अल्टिमेटम दिल्याने हे पैसे जमा होण्यास सुरुवात

झाली आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे 

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी विमा कंपनीला अल्टिमेट केले होते की शेतकऱ्यांना सात दिवसाच्या

आत पैसे द्या अन्यथा कारवाई होईल अशी ठाम भूमिका राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतली होती.

खरिपातील पिकांचा प्रीमियम रक्कम म्हणून शेतकरी आणि केंद्र व राज्य सरकारचे मिळून अब्जावधी

विमा हप्ता मिळूनही भरपाईसाठी कंपनीकडून दुर्लक्ष होत होते. तर याकरिता अनेक वेळा शेतकऱ्यांनी

आंदोलन केले.

कृषी आयुक्त धीरज कुमार

राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी वेळेत विमा रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला

केल्या होत्या. अखेर सर्व स्तरातून विमा कंपन्यांचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना परभणी

बुलढाणा विमा कंपनीचे प्रतिनिधी वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व घडून आल्यानंतर गेल्या

2 दिवसापासून विम्याची रक्कम सर्व कंपनी ह्या वितरित करत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे

नुकसान झालेल्या असे 19 लाख 66 हजार शेतकऱ्यांची दावे निकाली काढण्यात आलेत.

Kharip Pik Vima Maharashtra

तर जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या दाव्यांचा विचार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली

आहे जिल्हा प्रशासनाकडून जे दावे दाखल करण्यात आलेल्या त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात

आल्याची माहिती समोर येत आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या बदल्यात विमा

कंपन्यांनी 1301 कोटी रुपये हे वितरीत केलेत. अजूनही 16 लाख 65 हजार शेतकऱ्यांना 968 कोटी

रुपये (Kharip Pikvima 2021 List) वितरित करणे बाकी आहे.

अजून 16 लाख 65 हजार शेतकऱ्यांना 968 कोटी रुपये वितरित होणे अजून बाकी आहे यावर रक्कम

जमा होण्यास अजूनही चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे कृषी विभागाने विमा रकमेबाबत

घेतलेली भूमिका अखेर कामी व शेतकऱ्यांच्या देखील फायद्याची ठरली.  शेतकऱ्यांना विमा रक्कम जमा

होण्यास सुरुवात झाली आहे. परभणी जिल्हा उस्मानाबाद जिल्हा अशा विविध जिल्ह्यांमध्ये विमा रक्कम

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

पिक विमा मिळाला नाही मग मिळेल का ? 

खरीप पिक विमा रकमेबाबत समस्या असल्यास आपल्याला काय करायचे तर पहा अधिकतर 

शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम अदा होत आहे असे असतानाही काही शेतकऱ्यांना भरपाई

मिळू शंका असल्यास त्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय कृषी अधिकारी किंवा विमा कंपनीचे

प्रतिनिधींशी संपर्क साधणे गरजेचे आहे यासंबंधी ची संपूर्ण माहिती कृषी आयुक्त धीरजकुमार राज्याचे

कृषी आयुक्त आहेत त्यांनी या वेळेस दिली आहे


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment