Kharip Pikvima List 2021 | याजिल्ह्याला तूर,सोयाबीन,कापूस हेक्टरी 28 हजार रु.

Kharip Pikvima List 2021 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी

आहे खरीप हंगाम सन 2021 पिक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर होऊन बँक खात्यात जमा

होण्यास सुरुवात झाली आहे तर कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा जमा

होतोय संपूर्ण माहिती पाहूयात कापूस सोयाबीन तूर या पिकांचा विमा मंजूर झाला आहे तर काय हेक्टरी

हा विमा मिळाला आहे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती पाहूया

खरीप हंगाम सन 2021-22

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे शुक्रवार म्हणजेच काल

रोजी सकाळी मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर विमा जमा झाले चे मेसेज शेतकऱ्यांना

मिळाले आहे तर पीक निहाय आणि पिकाच्या स्थितीनुसार शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आहे अर्थातच

प्रत्येक पिकाची वेगवेगळे विमा मंजूर झालेल्या आणि प्रत्येकाचं नुकसान किती झाल्यावर ती पिक विमा

मंजूर झाला आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील 2021 मध्ये पिक विमा

भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा

होण्यास सुरू झालेले आहे आणि याठिकाणी शुक्रवारपासून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर

पैसे जमा झाली चे मेसेज शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहे तर यामध्ये जर आपण पाहिले तर खरीप

हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनचा जास्तीत जास्त विमा उतरवला होता आणि आता रक्कम जमा होण्यास

सुरुवात झाली आहे तर शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आले (Kharip Pikvima List 2021)

नाही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम वातावरण तयार झाले आहे

सोयाबीन पिक विमा यादी 2021 

पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास दिरंगाई

झाली आहे. दिवाळीमध्ये ही रक्कम जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिले होते.

मात्र, दीड महिन्यापासून हे पैसे प्रक्रियेतच अडकले होते. आता कुठे पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे.

हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार असले तरी कुण्या शेतकऱ्यास अडचण असल्यास त्या शेतकऱ्यांनी

बॅंकेत किंवा विमा कंपनीकडे नाही तर आपली तक्रार ही तहसीलदार यांच्याकडे दाखल करावी लागणार

आहे. त्यानंतरच तक्रारीचे निर्सण होणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आगोदर विमा रक्कम भरली होती

त्यांना अगोदर लाभ मिळत आहे.

कापूस,सोयाबीन,तूर विमा मंजूर यादी 

खरीप हंगामात सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचा विमा मंजूर झाला आहे.  प्रत्येक मंडळानुसार विमा तूर

या पिकाला हेक्टरी 22 ते 25 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली, सोयाबीनला हेक्टरी सरासरी 15 ते

18 हजाराची भरपाई आली आहे  आणि कापसाला हेक्टरी 26 ते 28 हजाराची भरपाई मंजूर झाली आहे 

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. मंडळानिहाय नुकसानभरपाईची रकमेत बदल आहे

यामध्ये थोडे फार रक्कम कमी जास्त होऊ शकते आणि विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

झालेली आहे.

ऑनलाईन तक्रार न करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय?

विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन दावे करावेच असे नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी

ऑफलाईनही विमा रक्कम कंपनीकडे जमा केली आहे  त्यांना देखील ही भरपाई मिळणार आहे. एवढेच

की, ज्या शेतकऱ्यांनी अगोदर विमा रक्कम कंपनीकडे अदा केली आहे त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ

मिळत आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांच्याही बॅंक खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे क़ृषी

अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


📢 10 शेळ्या 1 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 गाय/म्हैस अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु:- येथे पहा 

Leave a Comment