Kharip Pikvima Manjur Yadi:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30 ते 36 हजार रुपये विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी 15 ते 16 हजार रुपये आज पासून 6 12 2019 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे ्याचबरोबर कोणत्या जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यात हा विमा 30 ते 35 हजार रुपये प्रति हेक्टरी मिळण्यास सुरुवात झाली आहे संपूर्ण अपडेट काय जाणून घेणार आहोत या लेखामध्ये रु.३० ते ३६ हजार/हेक्टरी पिकविमा आपल्या हक्काचा…. मिळविणार
अनुक्रमणिका
खरीप २०२१ हंगाम उस्मानाबाद
सोयाबीनचे नुकसान हे ७० ते ८० % झालेले आहे असा कृषी व पिक विमा कंपनीचा अहवाल आहे. योजनेच्या कार्यप्रणालीतील मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत रु. १५ ते १८ हजार/हेक्टर पिक विमा देण्याचा बजाज अलायन्स कंपनीचा मानस आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यपद्धतीतील मार्गदर्शक सूचनांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक कापणी प्रयोग यामध्ये १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी असल्यास नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान व पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून निष्पन्न झालेले नुकसान ५०-५० टक्के प्रमाणे नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्याचे नमूद आहे.
kharip Pik Vima Manjur 2021
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये साधारणत: २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती. जिल्ह्यातील सोयाबीन पिकांची काढणी मात्र १५ ऑक्टोबर पासून सुरु केली जाते पीक कापणी प्रयोग देखील या दरम्यानच घेतले जातात, त्यामुळे हा नियम प्राप्त परिस्थितीत लागू होत नाही, याचा अर्थ असा की, नुकसान भरपाई प्रत्यक्ष झालेल्या नुकसानी प्रमाणेच अनुज्ञेय आहे. सोमवार दि. ०६/१२/२०२१ पासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ लावण्यात आल्याने सध्याची देय नुकसान भरपाई कमी आहे. ही चूक दुरुस्त करून वाढीव पिक विमा द्यावा लागणार आहे व तो अधिकचे १५ ते १८ हजार /हे.च्या दरम्यान असणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण रु. ३० ते ३६ हजार प्रती हेक्टरी हक्काचे मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा चालू आहे.
खरीप पिक विमा 2021-22
10 पात्र जिल्हे व 17 लाख शेतकरी परभणी, जालना, बुलढाणा, सांगली, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नंदुरबार भंडारा या दहा जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा पात्र झालेले आहे येत्या आठ दिवसाच्या आत या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा लाख शेतकऱ्यांना 430 कोटी रुपयांचा विमा हा (Kharip Pikvima Manjur Yadi) मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे
📢 ई-श्रम कार्ड योजना अंतर्गत शेतकरी व शेत मजुरांना 2 लाख रु. मिळणार :- येथे पहा सविस्तर माहिती
📢 श्रम योगी मानधन योजना अर्ज कसा करावा व अर्ज लिंक :- येथे पहा