Kisan Credit Card Marathi | किसान क्रेडीट कार्ड कर्ज कसे घ्यावे? | किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा ? | किसान क्रेडिट कार्ड आवश्यक कागदपत्रे

Kisan Credit Card Marathi :– नमस्कार सर्वाना शेतकरी बांधवासाठी मोठी आनंदची बातमी आहे. आजच्या लेखामध्ये आपण किसान क्रेडीट कार्ड योजना विषयी

माहिती जाणून घेणार आहोत. जसे शेतकऱ्यांना किसान क्रेडीट  कार्ड कसे मिळेल व त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज कसा करावा व त्यासाठी कागदपत्रे कोणते लागतात.

भारतीय रिजर्व बँक यांचे मार्गदर्शन सूचना व शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी एकरी काय कर्ज मिळणार किसान क्रेडीटसाठी

कोणत्या बँकेत अर्ज सदर करायचा आहे. ही संपूर्ण माहिती या लेखा मध्ये जाणून घेण्यासाठी  हा लेख संपूर्ण वाचा.

Kisan Credit Card Marathi

शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटक नाशके इत्यादींसारख्या कच्चा माल खरेदी करता यावा आणि त्यांच्या उत्पादना संबंधीच्या गरजांसाठी रोख रक्कम काढता

येण्यास शेतक-यांनी वापरण्यासाठी त्यांच्या धारणांच्या आधारावर, शेतक-यांना किसान क्रेडिट कार्डे देण्यासाठी, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना, 1998 मध्ये सुरु करण्यात आली

असून ती बँकांनी एकसमानतेने स्वीकारावयाची आहे. ही योजना, 2004 मध्ये, शेतक-यांच्या गुंतवणुक कर्ज गरजांसाठीही (म्हणजे संबंधित व बिगर शेती कार्यकृती) विस्तारित करण्यात आली.

हेही वाचा:- नवी सिंचन विहीर 100% अनुदान योजना 202 सुरु येथे पहा माहिती 

किसान क्रेडिट कार्ड योजना

हीच योजना अधिक सुलभ करण्यासाठी व इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्डे देण्यासाठी, श्री टी एम भसीन, इंडियन बँकेचे सीएमडी ह्यांच्या अध्यक्षतेखालील एका कार्यकारी

गटाने 2012 मध्ये पुनरुज्जीवित करण्यात आली. ही केसीसी योजना कार्यरत करण्यासाठी बँकांना स्थूलमानाने मार्गदर्शक तत्वे देते.

ह्या योजनेची अंमलबजावणी करणा-या बँकांना, संस्थात्मक/स्थळात्मक आवश्यकतानुसार तिचा अंगिकार करता येऊ शकेल.

Kisan Credit Card Yojana 2023

पुढील परिच्छेदांमध्ये सविस्तरपणे दिलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी, वाणिज्य बँका, आरआरबी, लघु वित्त बँका व सहकारी बँकांनी करावयाची आहे.

शेतक-यांच्या पुढे दिलेल्या शेतीविषयक व इतर गरजांसाठी, एकाच खिडकीमधून व सुलभ व लवचिक कार्यरीतींनी, बँकिंग प्रणालीकडून, वेळच्या वेळी व पुरेसे कर्ज उपलब्ध करणे हे किसान क्रेडिट कार्डचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा:- SBI बँक देणार 85% शेत जमीन खरेदी साठी कर्ज येथे पहा माहिती 

किसान क्रेडीट कार्ड कोणाला मिळणार कर्ज 

(अ) पिके घेण्यासाठी आवश्यक असलेल्या लघु मुदत कर्जाच्या गरजा पूर्ण करणे.
(ब) कापणी/हंगामासाठीचे खर्च
(क) उत्पादनांचे विपणन करण्यासाठीचे कर्ज
(ड) शेतक-यांचा घरखर्च
(ई) शेती-मालमत्ता व शेती संबंधित कार्यकृतींचे परिरक्षण करण्यासाठी कार्यकारी भांडवल.
(फ) शेती व संबंधित कार्यकृतींसाठीच्या गुंतवणुक कर्ज गरजा.

टीप :- वरील अ ते ई ह्या घटकांपर्यंतची एकूण रक्कम लघु मुदतीची कर्ज मर्यादा असेल आणि (फ) मधील घटकाची रक्कम दीर्घ मुदतीची कर्ज मर्यादा असेल.

किसान क्रेडीट कार्ड पात्र शेतकरी

  • शेतकरी :- मालक व शेतकरी असलेली व्यक्ती/संयुक्त कर्जदार
  • भाड्याने शेती करणारे शेतकरी, मौखिक भाडेपट्टेकार व पिकाची वाटणी करणारे
  • शेअर क्रॉपर्स ह्यासह शेतक-यांचे संयुक्त दायित्व गट (जेएलजी) इत्यादि.

सीमान्त शेतकरी सोडून सर्व शेतकरी

पहिल्या वर्षासाठी ठरविण्याची लघु मुदत मर्यादा (एका वर्षात एकच पीक घेण्यासाठी त्या पिकासाठीच्या वित्तसहाय्यासाठीचे स्केल (प्रमाण) (जिल्हा स्तरीय तांत्रिक समितीने ठरविल्यानुसार) x शेती केलेल्या

जमिनीचे क्षेत्रफळ + हंगामा नंतरचा खर्च/घर खर्चासाठी असलेल्या मर्यादेच्या 10% + शेती मालमत्ता ठेवण्यात + पीक विमा आणि/किंवा पीएआयएस, स्वास्थ्य विमा व मालमत्ता विमा ह्यासह साठीच्या मर्यादेच्या 20%

येथे पहा कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्ज हे कोणत्या पिकांसाठी देण्यात येते पहा माहिती 

किसान क्रेडिट कार्ड आवश्यक कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट -शेतकऱ्याच्या
  • जमिनीची कागदपत्रे
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. बँकेत जा आणि किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरा. 

यानंतर, तुम्हाला वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर, (Kisan Credit Card Marathi) तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *