Kisan Credit Card Yojana | आता शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड करिता फक्त हे 3 कागदपत्रे लागणार, पहा लगेच

Kisan Credit Card Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. या तीन कागदपत्रावर किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. हे किसान क्रेडिट कार्ड काय आहे ?, किसान क्रेडिट कार्डचे फायदे ?, आणि त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा लागतो. कोणते 3 कागदपत्रे आहेत, यावर किसान क्रेडिट कार्ड आहे हे मिळणार आहे हे जाणून घेऊयात.

Kisan Credit Card Yojana

शेतकऱ्यांना बी-बियाणे असो किंवा कीटकनाशक, खते, किंवा सिंचन यासाठी पैशांची गरज असते. आणि बँक कडून कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी बांधव बँकेचे उंबरठे झिजवत असतात. परंतु शासनाने यासाठी महत्त्वाचे अशी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. तेही कमी व्याजदरात तर या अर्ज कसा करायचा आहे. ही योजना चे कागदपत्रे कोणकोणते आहेत. याबाबत सविस्तर माहिती लेखात पाहणार आहोत.

किसान क्रेडिट कार्ड कोण घेऊ शकतो ? 

क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. किसान क्रेडिट कार्डची प्रक्रिया अत्यंत किचकट ही मानली जात होती. तर यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे. म्हणजे सोपी करण्यात आलेले आहे. तर किसान क्रेडिट कार्डचा लाभ केवळ शेतीपुरता मर्यादित नाही, तर यामध्ये पशुपालक, मच्छीमार यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. आणि किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत तीन लाख पर्यंत कर्जाची रक्कम आपल्याला मिळू शकते. यासाठी वयोमर्यादा आपण पाहिली तर अर्जदाराची वय 18 ते 75 वर्ष असावे. त्यामुळे भाड्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा ला मिळू शकतो. अर्थातच जे शेतकरी करारावर आहे किंवा भाडेतत्त्वावर शेती घेतलेली आहे. जे काय असेल त्यांना देखील किसान क्रेडिट कार्डचा लाभ दिला जातो.

किसान क्रेडीट कार्ड कागदपत्रे ?

आता किसान क्रेडिट कार्ड पीएम योजनेची जोडले गेलेले आहे. आणि त्याच वेबसाईटवर किसान क्रेडिट कार्ड अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता किसान क्रेडीट कार्ड अर्ज करण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि फोटो आवश्यक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळू शकतो.

किसान क्रेडिट कार्डचे फायदे ?

त्यामध्ये योजनेअंतर्गत तीन लाख कर्ज हे 07 टक्के व्याजदराने दिले जाते. तसेच जे शेतकरी कर्जाची रक्कम वेळेत परत करतात त्यांना तीन टक्के सवलत दिली जाते, म्हणजे चार टक्के दराने शेतकऱ्यांना पीक कर्ज हे मिळू शकत. किंवा पशुपालकांना खरेदीसाठी किंवा अन्य कामासाठी कर्ज या ठिकाणी कर्ज मिळू शकते. ही कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील व्हिडिओ जाणून घेण्यासाठी किंवा माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ आपल्याला पहावयाचा आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *