Krushi Vij Bill Mafi yojana | 50% कृषी पंप वीज माफ होणार नवीन योजना सुरु

Krushi vij Bill Mafi yojana 2021 | 50% कृषी पंप वीज माफ होणार नवीन योजना सुरु

शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना कृषी वीज बिलात अर्थातच कृषी पंपाच्या वीज बिलात 50% टक्के सवलत म्हणजे 50% टक्के माफी देण्यात येणार आहे.

50% वीज बिल माफी योजना 

कृषी योजना 2020 सुरू झाल्यापासून पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकी वर संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ मागील पाच

वर्षाच्या थकबाकी वरील संपूर्ण विलंब आकार माफ व व्याजदरात सवलत अशाप्रकारे सुधारित थकबाकीची रक्कम कृषी पंप

ग्राहकांच्या सोयीनुसार तीन वर्षात भरण्याची मुभा म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत भरता येईल. पहिल्या वर्षात म्हणजेच 18

डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2022 सुधारित देयक पूर्ण भरल्यास केवळ 50% टक्के रक्कम भरायची आहे आणि 50% टक्के

रक्कम माफ होणार आहे दुसरे वर्ष म्हणजेच 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च ते 2023 या कालावधीत जेवढी रक्कम भरली जाईल 

त्यात 30% टक्के रक्कम माफ होणार आहे तिसरे वर्ष म्हणजेच 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जेवढी

रक्कम भरली जाईल त्याच्या 20% टक्के रक्कम माफ होणार आहे (Krushi Vij Bill Mafi yojana) ही योजना कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना देखील लागू राहील.

कृषी योजना धोरण २०२१

5 वर्षां पूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ करून केवळ मूळ थकबाकीच वसुलीसाठी ग्राह्य धरली आहे. धोरणात कृषीपंप ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून, दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के व तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीजबिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. 

ग्रामपंचायतींना बिल भरणा केंद्र 

वीजबिल थकबाकी वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीला वीजबिल भरणा केंद्र म्हणून प्रतिवीजबिल वसुलीपोटी पाच रुपये, थकबाकी वसूल केल्यास, वसूल केलेल्या थकबाकीच्या ३० टक्के रक्कम, चालू वीजबिल वसूल केल्यास वसुली रकमेच्या २० टक्के मोबदला देण्याचे धोरणात प्रस्तावित आहे. गावपातळीवर सहकारी संस्था, महिला बचतगट, “महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांची ‘वीज देयक संकलक एजन्सी’ म्हणून नेमणूक करण्यात येईल. शेतकरी सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांना वसूल केलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. 

कृषी योजना काय आहे ? 

  • कृषीपंपांना २०० मीटरपर्यंत लघुदाब वाहिनीद्वारे वीजजोडणी 
  • २०० ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वाहिनीद्वारे वीजजोडणी 
  • ६०० मीटर कृषिपंपांना सौरपंपाद्वारे नवीन वीजजोडणी
  • कृषी ग्राहकांना कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीजपुरवठा
  • कृषीपंप ग्राहकांनी थकबाकी भरल्यास ५० टक्के अतिरिक्त सूट
  • दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के अतिरिक्त सूट
  • तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट 

50% वीज बिल माफ वेबसाईट link 

https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app


📢 50% वीज बिल माफी कशी मिळेल :- हा video पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना online अर्ज सुरु:- येथे पहा 

Leave a Comment