Kukut Palan Anudan Yadi :- नमस्कार सर्वांना. (poultry farming) आजच्या लेखामध्ये महत्त्वाचा अपडेट आपण पाहणार आहोत. कुक्कुटपालन संदर्भात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. कुक्कुट पालनासाठी 2278 शेतकऱ्यांना 33 कोटी 43 लाख रुपयांचा लाभ होणार आहे. यासाठी जिल्हानिहाय लाभार्थी व लाभार्थी अनुदान या ठिकाणी आलेला आहे. तर हेच त्याचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. (poultry farming in india)
Kukut Palan Anudan Yadi
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन कडे जावे लागते. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 1000 कुकुट मांसल पक्षांचे संगोपन करण्याची नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. त्यातून यंदा राज्यातील 2278 लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. तर यावर अनुदाना पोटी 33 कोटी 43 लाखाची अनुदान दिलेले आहे. तर जिल्ह्यानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75% टक्के अनुदान दिले जाणार आहे.
कुकुट पालन अनुदान
तरी अनुदान देण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा अधिक तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जर आपण ऑनलाइन पद्धतीने महा बीएमएस या पोर्टल वरती अर्ज केले असतील. तर ते पुढील पाच वर्षांसाठी प्रतीक्षा यादी मध्ये असणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला पुढील वर्षी देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1 लाख 12 हजार 500 रुपये. तसेच अनुसूचित जाती जमातीतील एक लाख 68 हजार 750 रुपये अनुदान ही दिले जात आहे. तर सोडत पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत ?, आणि त्यांना किती निधी दिला जाईल हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती आपण पहावी.
कुक्कुट पालन जिल्हानिहाय लाभार्थी,अनुदान
जिल्हानिहाय लाभार्थी (कंसात अनुदान) ठाणे :- २८ (३८ लाख २७ हजार). पालघर: २५ (२९ लाख ७७ हजार), रायगड : ३६ (४७ लाख १३ हजार). रत्नागिरी : ३० (३९ लाख ९१ हजार), सिंधुदुर्ग : ३० (२७ लाख २८ हजार), पुणे: १२० (१ कोटी ८२ लाख ८० हजार). सातारा : ८१ (१ कोटी१६ लाख ९६ हजार). सांगली : ७७ (१ कोटी १३ लाख ४ हजार), सोलापुर : ११२ (१ कोटी ८५ लाख ९७ हजार). कोल्हापुर : १०४ (१ कोटी ५४ लाख १६ हजार). नाशिक : ९४ (१ कोटी २९ लाख ३३ हजार), धुळे : ३६ (४९ लाख ७३ हजार). नंदुरबार : २६ (३१ लाख ८३ हजार). जळगाव : ९२ (१ कोटी ३० लाख ९२), नगर : १३४ (१ कोटी ९७ लाख ६०), अमरावती : ९१ (१ कोटी ३८ लाख २७ हजार).
कुक्कुट पालन जिल्हानिहाय अनुदान
बुलडाणा : १०२ (१ कोटी ५६ लाख ६७ हजार). यवतमाळ : ७७ (१ कोटी १३ लाख ४७ हजार), अकोला : ६३ (९७ लाख १० हजार), वाशीम : ५१ (७८ लाख ६० हजार). नागपूर : ६६ (९७ लाख १५ हजार), भंडारा: ४३ (६४ लाख १९ हजार), वर्धा : : ३४ (५० लाख १४ हजार), गोंदिया : ३७ (६० लाख १५ हजार). चंद्रपूर : ५६ (८० लाख १ हजार), गडचिरोली : ३३ (४३ लाख ३५ हजार). औरंगाबाद : ७६ (१ कोटी १० लाख ९१ हजार), जालना : ६५ (९६ लाख ४५ हजार), परभणी : ५० (७६ लाख ५६ हजार). बीड : ८२ (१ कोटी २० लाख ८२ हजार). लातुर : ९४ (१ कोटी ४५ लाख ३० हजार), उस्मानाबाद : ६१ (९१ लाख ६० हजार) नांदेड : १२३ (१ कोटी ८७ लाख ६२ हजार), हिंगोली : ६६ लाख ८२ हजार.
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा
📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा