Kukut Palan Anudan Yojna : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधव तसेच उद्योजकसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून कुक्कुटपालन अनुदान योजनाही सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून या योजनेसाठी आजच सादर करून अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे. तर या ठिकाणी किती अनुदान दिले जाणार आहे. किती कुक्कुट पक्षी असतील किती अंडी उबवणी याबाबतचा शासन निर्णय. आणि त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता. याविषयी सविस्तर माहिती या लेखात (कुकुट पालन अनुदान योजना 2022) आपण पाहणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती सविस्तरपणे समजून येईल.
Kukut Palan Anudan Yojna
वैयक्तिक, FPOs, FCOs JLGs, SHGs, कलम 8 कंपन्यांना उद्योजकता विकासासाठी प्रोत्साहन देऊन कुक्कुट, मेंढ्या, शेळी आणि डुक्करपालनात उद्योजकता विकास आणि जाती सुधारण्यावर तीव्र लक्ष केंद्रित करण्याचा प्रस्ताव आणि जातीच्या संरचना सुधारणेसाठी राज्य सरकारला देखील.
शेळी पालन योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
कुकुट पालन अनुदान योजना 2022
केंद्र सरकारने विविध योजना शेतकरी बांधव तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आहेत. आणि यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना. तर ही कुक्कुटपालन योजना राष्ट्रीय पशुधन अभियान योजना या अंतर्गत राज्यात राबविण्यातयेते. आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा शासनाने निर्गमित केलेला आहे. सदर योजनेअंतर्गत कुक्कुटपालनासाठी 50% टक्के अनुदान दिलं जातं. आणि या योजनेचे ऑनलाइन अर्ज कसा करायचा कागदपत्रे, पात्रता, सविस्तर माहिती या लेखात पहाणार आहोत. आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान योजनेतून घेऊ शकता. 50 टक्के नुसार प्रश्न उरतो तो म्हणजे पन्नास टक्के अनुदान ते नेमके हे कोणाला दिले जाणार आहे. त्यासाठी खालील माहिती पहा.
कुकुटपालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म
अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचा रद्द केलेला चेक, छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे. तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म ↩(अर्ज) भरा.
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा