Kukut Palan Online Form | कुकुटपालन 1लाख 68 रु. अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु

(Kukut Palan Online Form) नमस्कार सर्वाना आजच्या लेखामध्ये कुकुट पालन योजना विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत 1000 मांसल कुक्कुट पालन योजना राज्यात पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत जसे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत पात्रता काय असेल ऑनलाइन अर्ज कोणाला करता येणार आहे ऑनलाइन अर्ज कसा करावा ही संपूर्ण ए टू झेड माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

कुकुट पालन ऑनलाईन अर्ज कसा करावा

कुकुट पालन अनुदान योजना चा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दोन प्रक्रिया आहे त्यामध्ये सर्वप्रथम ऑनलाईन पद्धत आहे त्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट ah.mahabms.com या वेबसाइटवर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आपण अगदी सोप्या पद्धतीत ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच आपणास ऑनलाईन अर्ज करावयाचा असल्यास खाली दिलेल्या व्हिडीओ आपण पाहू शकता आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कुकुटपालन ऑनलाईन योजना फॉर्म

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दुसरा पर्याय  शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही सुवर्णसंधी आहे यामध्ये 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर यामध्ये दुसरा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ही स्वतःच्या स्मार्टफोनवरून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता यामध्ये आपल्याला पशुसंवर्धन विभागाचे मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे पशुसंवर्धन ah.mahabms या नावाचा एप्लीकेशन प्लेस्टोर इन्स्टॉल करायचा आहे आणि त्यावरून ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज सादर करू शकता मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कसा करावा कागदपत्रे अपलोड कशी करावी छायाचित्र स्टाईल आपल्या स्वतःची स्वाक्षरी असेल ती कशी अपलोड करावी (Kukut Palan Online Form) सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ आपण पाहू शकता.

कुकुट पालन योजना 2022

1000 मांसल कुकुट पालन पक्षी अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याचबरोबर योजनेची परिपूर्ण संपूर्ण माहिती तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक :- येथे पहा 

सदर योजनेचा कालावधी

1000 मांसल कुक्कुट पक्षी साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी तसेच अंतिम दिनांक 4 डिसेंबर 2021 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज आपण सादर करू शकता व्हिडिओ येथे पहा :- 

1000 मांसल पक्षी कुकुट पालन योजना 
अ.क्र. तपशील लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात) एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
1 जमीन लाभार्थी स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
2 पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण लाभार्थी / शासन 2,00,000/-
3 उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ. लाभार्थी /शासन 25000/-
एकूण खर्च 2,25,000/-
कुकुट पालन योजना अनुदान किती ? 
अ.क्र. प्रवर्ग 1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के

                                    

१,६८,७५०/-
1 स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के

                                    

५६,२५०/-
1 शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के

                                    

१,१२,५००/-
2 स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के

                                    

१,१२,५००/
कुकुट पालन अनुदान योजना कागदपत्रे
 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
 • सातबारा (अनिवार्य)
 • ८ अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
 • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

📢 40+2 शेळी पालन योजना :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर करा 100 रु. फक्त :- येथे पहा 

Leave a Comment