Kusum Solar Pump Online Form : नमस्कार सर्वाना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र मध्ये सुरू झालेले आहे. तर कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत एससी, एसटी कॅटेगिरीतील लाभार्थ्यांसाठी 95% टक्के अनुदान. तसेच इतर कॅटेगरीचे लाभार्थ्यांसाठी 90% टक्के अनुदानावर सोलर पंप योजना सुरू करण्यात आली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख नक्की संपूर्ण वाचा जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल.
Kusum Solar Pump Safe Village List
आपल्याला प्रश्न पडला असेल की कुसुम सोलर पंप योजना मध्ये सेफ व्हिलेज लिस्ट नेमकं काय आहे. तर सेफ विलेज लिस्ट ही ज्या भागात म्हणजे ज्या ठिकाणी महावितरण पोहचलेल नाही त्या भागाला सेफ व्हिलेज लिस्ट म्हणण्यात आलं. या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये गावाचे नाव असेल त्यांना म्हणजे ते डायरेक्ट फॉर्म भरू शकता म्हणजे डिझेल पंप नाही यामधून. या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये आपल्या गावाचे नाव नसेल तर आपण डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करू शकता. आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 Hp पर्यंत सौर पंप उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारण वर्गावरी लाभार्थ्यांची कृषी पंप किमतीच्या 10% टक्के तर अनुसूचित जाती.
अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% टक्के लाभार्थी हिस्सा म्हणजेच स्वतः खर्च करणं आवश्यक आहे. म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी एकूण 90% टक्के अनुदान. तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील प्रवर्गासाठी एकूण 95% टक्के अनुदानावर ही योजना राबवली जाते.
https://www.youtube.com/watch?v=7fXknxlM_pc
कुसुम सोलर पंपाची किंमत 2022
3 एचपी च्या पंपासाठी GST सह 178097 रु., 5Hp पंपसाठी 253205 रु., 7.5 Hp पंपसाठी 390903 रु. एवढा प्रति पंप असणार आहे. (Kusum Solar Pump Online Form) आणि आता पाहुयात लाभार्थ्यांना अनुदान किती दिले जाणार किती hp च्या पंपासाठी. यामध्ये लाभार्थी हिस्सा खुला प्रवर्गासाठी 3Hp Pump मूळ किंमत 15650 रु. GST 13.8% एकूण 17810 रु. 5Hp मूळ किंमत 22 हजार 250 रुपये जीएसटी 3 हजार 71 रुपये.
एकूण 25321 रु. 7.5 Hp पंप 34 हजार 350 रुपये जीएसटी 4 हजार 740 रुपये एकूण 39 हजार 990 रुपये. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3 एचपी पंपासाठी 7 हजार 825 रुपये. जीएसटी 1080 रुपये एकूण 8 हजार 905 रुपये. 5 एचपी पंपासाठी 11 हजार 125 रुपये जीएसटी 1535 रुपये एकूण 12 हजार 660 रुपये. 7.5 एचपी पंपासाठी मूळ किंमत 17 हजार 175 रुपये जीएसटी 2 हजार 370 रुपये आणि एकूण 19 हजार 545 रुपये असे लाभार्थी स्वतः हिस्सा भरणे आहे.
📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा
📢 40 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना :- येथे पहा