Kusum Solar Pump Online Registration | कुसुम सोलर पंप नवीन फॉर्म सुरु 2022

Kusum Solar Pump Form

Kusum Solar Pump Online Registration : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप अनुदान योजना नवीन नोंदणीसाठी सुरू झाली आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोठा म्हणजेच किती पंप शिल्लक आहेत. याची माहिती तसेच योजनेसाठी किती फी लागते याबाबत संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Kusum Solar Pump Safe Village List

आपल्याला प्रश्न पडला असेल की कुसुम सोलर पंप योजना मध्ये सेफ व्हिलेज लिस्ट नेमकं काय आहे. तर सेफ विलेज लिस्ट ही ज्या भागात म्हणजे ज्या ठिकाणी महावितरण पोहचलेल नाही त्या भागाला सेफ व्हिलेज लिस्ट म्हणण्यात आलं. या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये गावाचे नाव असेल त्यांना म्हणजे ते डायरेक्ट फॉर्म भरू शकता म्हणजे डिझेल पंप नाही यामधून. या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये आपल्या गावाचे नाव नसेल तर आपण डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करू शकता. आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

Kusum Solar Pump Online Apply 

पीएम किसान सोलर पंप योजनामध्ये ऑनलाइन फॉर्म अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपणास (महा उर्जाच्या) वेबसाईटवर जायचे आहे. त्यानंतर आपल्याला सेफ व्हिलेज लिस्ट नाव दिसेल त्याठिकाणी तो पीडीएफ आपणास ओपन करून त्यामध्ये आपल्या गावाची यादी चेक करायची आहे.त्यामध्ये आपलं गावाचं नाव असेल तर आपण डीझेल पंप नाही. म्हणून नोंदणी करा आणि नाव नसेल तर आपण डीझेल पंप आहे म्हणून नोंदणी करा. याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ आपण पाहू शकता.

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 Hp पर्यंत सौर पंप उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारण वर्गावरी लाभार्थ्यांची कृषी पंप किमतीच्या 10% टक्के तर अनुसूचित जाती. अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% टक्के लाभार्थी हिस्सा म्हणजेच स्वतः  खर्च करणं आवश्यक आहे. म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी एकूण 90% टक्के अनुदान. तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील प्रवर्गासाठी एकूण 95% टक्के अनुदानावर ही योजना राबवली जाते.

कुसुम सोलर पंप जमीन किती ? 

लाभार्थीचे निवडीचे ठळक निकष :- शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी, नाले, त्यांच्या शेजारील तसेच शाश्‍वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे. शेतकरी पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेस पात्र आहे.अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेले तथापी मंजूर न झालेले अर्जदार. 2.5 एकर शेत जमीन लाभार्थ्यांना 3Hp तसेच 5 एकर शेत जमीन लाभार्थ्यांना 5 एकर त्यापेक्षा जास्त शेत जमीन लाभार्थ्यांस 7.5 एचपी. अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुदान देय आहे.

कुसुम सोलर पंपाची किंमत 2022 

3 एचपी च्या पंपासाठी GST सह 178097 रु., 5Hp पंपसाठी 253205 रु., 7.5 Hp पंपसाठी 390903 रु. एवढा प्रति पंप असणार आहे. आणि आता पाहुयात लाभार्थ्यांना अनुदान किती दिले जाणार किती hp च्या पंपासाठी. यामध्ये लाभार्थी हिस्सा खुला प्रवर्गासाठी 3Hp Pump मूळ किंमत 15650 रु. GST 13.8% एकूण 17810 रु. (Kusum Solar Pump Online Registration) 5Hp मूळ किंमत 22 हजार 250 रुपये जीएसटी 3 हजार 71 रुपये. एकूण 25321 रु.  7.5 Hp पंप 34 हजार 350 रुपये जीएसटी 4 हजार 740 रुपये एकूण 39 हजार 990 रुपये. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3 एचपी पंपासाठी 7 हजार 825 रुपये. जीएसटी 1080 रुपये एकूण 8 हजार 905 रुपये 5 एचपी पंपासाठी 11 हजार 125 रुपये जीएसटी 1535 रुपये एकूण 12 हजार 660 रुपये. 7.5 एचपी पंपासाठी मूळ किंमत 17 हजार 175 रुपये जीएसटी 2 हजार 370 रुपये आणि एकूण 19 हजार 545 रुपये असे लाभार्थी स्वतः हिस्सा भरणे आहे.


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन online फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !