Kusum Solar Pump Scheme | कुसुम सोलर पंप फॉर्म 2022 सुरु नवीन कोठा उपलब्ध

Solar Pump Yojana 2022

Kusum Solar Pump Scheme : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे आणि मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत आणि या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 95% टक्के. तर खुल्या प्रवर्गातील व इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 90% टक्के अनुदान या कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिलं जातं. आणि या योजनेविषयी सविस्तर संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. आणि कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु आहे कुठे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कॅटेगिरी साठी किती कोटा हा उपलब्ध आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेऊ तर हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत नक्की वाचा.

Kusum Solar Pump Scheme

महाकृषि ऊर्जा अभियान योजना 

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून अद्याप पुरवठादार कंपन्या व दर अंतिम झालेले नाहीत. त्यास एक महिना कालावधी लागण्याची शक्यता आहे (डिसेंबर, 2021 अखेर). दरम्यान केंद्र शासनाचे सुचनेप्रामणे मागील वर्षाचे पुरवठादार, मागील वर्षाचे दराने सौर पंप पुरविणेस तयार असतील. अशा पुरवठादारांकडून देकार मागवून 2750 सौर पंपासाठी प्रथम आलेल्या अर्जदारास प्राधान्य देऊन त्याची कार्यवाही सुरु आहे. केंद्र शासनाकडून या वर्षीचे पुरवठादार कंपन्या व दर आलेनंतरच या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरु होईल. तोपर्यंत अर्जदारांची प्राथमिक माहिती / मोबाईल नोंदणी करणेत येत आहे. केंद्र शासनाकडून सौर पंप पुरवठादार व दर ठरवून मिळाले. व राज्य शासनाचे सुकाणू समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झालेनंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठविणेत येतील. 

Kusum Solar Pump Scheme

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो पहा कायदा 

कुसुम सोलर पंप योजना अर्ज कुठे सुरू आहे

कोणत्या गावासाठी सुरू हे आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईल वरती चेक करता येणार आहे. आणि याद्वारे आपण आपल्या जिल्हानिहाय तालुका आहे. तसेच त्यातील महत्त्वाचं प्रत्येक कॅटेगरी नुसार 3 एचपी 5 एचपी साडेसात एचपी पंप प्रत्येक प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती उपलब्ध आहेत. हे आपल्याला स्वतःची मोबाईल वर ते कसे चेक करायचे. त्यासाठी खाली दिलेला तो माहिती आणि व्हिडिओ आपल्याला पाहिजे आहे. त्यानुसार आपण लाभार्थी किती शिल्लक आहे हे आपण हे चेक करू शकता.

कुसुम सोलर पंप कोठा उपलब्ध आहे कि नाही चेक करण्यासाठी येथे पहा 

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती ?

सोलर पंप योजना अंतर्गत 3 एचपी 5 एचपी आणि साडेसात एचपी या अश्‍वशक्तीच्या पंपना अनुदान देण्यात येणार आहे. आणि यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 95% टक्के अनुदान ही देण्यात येणार आहे. हे अनुदान सोलर पंपच्या एकूण 95 टक्के एवढा अनुदान देण्यात येणार आहे. आणि पाच टक्के हिस्सा हा स्वतःला भरने आहे. यातच खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 90 टक्के अनुदान कुसुम सोलर योजनेअंतर्गत दिला जातो. आणि 10 टक्के हिस्सा स्वतः भरणे आवश्यक आहे.

गाय म्हैस गोठा 100 गोठा अनुदान योजना सुरु GR आला येथे पहा

कुसुम सोलर पंप योजना किती एचपी हे किती जमीन धारकास दिले जाते

कुसुम सोलार मुंबई योजनेंतर्गत लाभार्थ्यांना त्याच्या शेत जमिनी नुसार म्हणजे किती शेत्र शेतकऱ्याला आहे. त्यानुसार 3 एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी पंप लाभार्थ्यांना दिले जातात. तर सर्वप्रथम अडीच एकर शेतजमीन धारकास 3 एचपी पंप दिला जातो. तर यामध्ये पाच एकर शेतजमीन धारकास पाच एचपीचा आणि त्यापेक्षा जास्त जमीन धारकास साडेसात एचपीचा पंप हा दिला जातो. आणि यासाठी 90% हे खुल्या प्रवर्गातील  लाभार्थ्यासाठी अनुदान आहे. आणि अनुसूचित जाती-जमातीतील प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 95 टक्के अनुदान कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत दिले जातात.

कुसुम सोलार पंप योजना कागदपत्रे

सातबारा उतारा, विहीर कूपनलिका, शेतात असल्याचा सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदारचे ना हरकत प्रमाणपत्र हे 200 रुपयाच्या मुद्रंक कागदपत्र वर सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आवश्यक आहे. रद्द केलेले धनादेश प्रत, म्हणजेच कॅन्सल चेक, किंवा बँक पासबुकची प्रत आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपला स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजेच फोटो हा (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र) देखील आपल्याला लागणार आहे. शेत जमीन विहीर, पाण्याचा पंप, सामायिक असल्यास इतर भागीदाराची नरकात प्रतिज्ञापत्रही लागणार आहे.

Kusum Solar Pump Scheme

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु पहा GR 

कुसुम सोलर पंप योजना किंमत 2022

सोलर पंप किंमत प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत तीन ते साडेसात एचपी च्या पंपा साठी अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येतं. तर यामध्ये लाभार्थी हिस्सा म्हणजेच स्वतः शेतकरी ने किती पैसे भरावे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तीन एचपीच्या खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पंप घेतल्यास त्याला एकूण 19 हजार 380 रुपये एवढा स्वतःचा खर्च करणे आवश्यक आहे. आणि यातच पाच hp पंप शेतकऱ्यांनी घेतला खुल्या प्रवर्गातील तर 37 हजार 975  रुपये. साडेसात एचपी पंप घेतलास तर त्याला 37 हजार 440 रुपये हा खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना खर्च हा स्वतः करावा लागणार आहे. आणि जे उर्वरित खर्च आहे हा 90 टक्के अनुदानावर खुल्या प्रवर्गातील (Kusum Solar Pump Scheme) लाभार्थ्यांना देण्यात येतो.

सोलर पंप योजना 2022 महाराष्ट्र 

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 3 एचपी पंप त्याचा एकूण नऊ हजार सहाशे नव्वद रुपये. तर 5 hp पंपासाठी 13 हजार 481 रुपये तर साडेसात एचपीचा पंप करिता 8720 रुपये एवढे स्वतः भरावे लागणार आहेत. आणि आपण एवढे पेमेंट भरून या ठिकाणी 90 ते 95 टक्के अनुदान हे घेऊ शकता. आणि आपल्या शेतात (Mahadiscom Solar) आपल्या विहिरी वर सोलर पंप आपण बसू शकता.

500 शेळ्या 25 बोकड केंद्राची योजना सुरु येथे पहा gr आला


📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार तारीख जाहीर :- येथे पहा 

📢 कुकुट पालन योजना 2022 25 लाख रु. अनुदान सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !