Kusum Solar Pump Yojana Beneficiary | कुसुम सोलर पंप असे चेक करा तुमच्या गावाचा कोटा किती उपलब्ध

Kusum Solar Pump Yojana Beneficiary :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी, आणि साडेसात एचपीचा पंप करिता अनुदान देण्यात येते. आणि कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्ग या लाभार्थ्यांना 95 तर. इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येते. तर याच विषयी सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि त्याचबरोबर आपण यामध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या गावांमध्ये किती पंप चा किती कोटा उपलब्ध आहे. ते ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करता येईल हे देखील माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kusum Solar Pump Yojana Beneficiary

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थीचे ठळक निकष : शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी. नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी यासाठी पात्र असेल. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी पात्र असेल. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा. त्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट कोणती आहे. या प्रश्नाचे संपूर्ण माहिती तसेच ऑफिशिअल वेबसाईट ची माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत. त्या आपण नक्की पहा.

Kusum Solar Pump Scheme

हेही वाचा; सदर योजनांचा अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती येथे पहा लगेच 

सोलर पंप कोटा किती उपलब्ध 

सोलर पंप अनुदान योजना आपल्या जिल्ह्यातील गावात कोणत्या प्रवर्गासाठी किती एचपी चा कोटा उपलब्ध आहे. हे ऑनलाइन कसे चेक करायचे आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती पाहून ऑनलाइन चेक करा. म्हणजेच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने चेक करून समजणार आहे. की आपल्या प्रवर्गासाठी किती एचपीच्या म्हणजेच तीन एचपी असेल पाच एचपी, साडेसात एचपीचा पंप करिता. आपल्या गावात किती कोटा उपलब्ध आहे ते ऑनलाईन पद्धतीने चेक करून आपण जाणून घेऊ शकता. त्यासाठी खालील माहिती पहा.

येथे पहा ऑनलाईन कसे चेक करायचे 

Pm kusum Solar Yojana 2022 

 • पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या 10 %
 • अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % या दराने अंशदान घेणार.
 • या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे30 टक्के वित्तीय  सहाय्य
 • राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.
 • एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या
 • लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.
 • सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला
 • इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.
 • या अभियांनातर्गत पुढील5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास
 • त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
 • सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे Online  
 • अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
 • यात2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ३ HP, ५ एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ५ HP
 • त्यापेक्षा जास्त  क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप 
 • सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (३ HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)

हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजना कागदपत्रे पात्रता येथे पहा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment