Kusum Solar Pump Yojana Documents | कुसुम सोलर पंप सेफ व्हिलेज लिस्ट कशी पहावी ? | कुसुम सोलर पंप ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुमच्या गावाचं नाव या यादीत शोधा मिळेल ९५% अनुदान पहा सविस्तर !

Kusum Solar Pump Yojana Documents :- ‘महाकृषि ऊर्जा अभियान’ अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची

प्रधानमंत्री कुसुम-ब योजना अंतर्गत योजना 90 ते 95% अनुदान देण्यात येते. या योजनेविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहुयात. राज्यातील फक्त या गावांमध्ये योजना राबविण्यात येणार आहे.

Kusum Solar Pump Yojana Documents

योजनेचे वैशिष्टये :-

  • पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
  • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP, 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार.
  • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
  • स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय.

लाभार्थी निवडीचे ठळक निकष :-

शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार. 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DO वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय राहील.

तुमचं गाव आहे का पाहण्यासाठी येथे पहा PDF

Kusum Solar Pump Yojana Documents

  • ७/१२ उतारा
  • (विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उतान्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत.
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
  • पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र

 

📋 हेही वाचा :- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !

Documents Required 

  • 7/12 Extract (If the well / tubewell in same land then it should
    be mentioned in the 7/12 extract)
  • The NOC shall be submitted on stamp paper of Rs.200/- If the land owners are multiple.
  • Aadhar Card Copy.
  • Cancelled Cheque Copy / Bank Passbook Copy.
  • Passport Size Photo.
  • If the Agriculture Land / Well/ Water Pump is shared the then
    NOC shall be submitted from other shareholders.

कुसुम सोलर पंप ऑनलाईन अर्ज 

 येथे क्लिक करून वेबसाईट चेक करा 

Official email id:- E-mail-re@mahaurja.com, दि.14/9/2021 रोजी पासून ऑनलाईन अर्ज 02:00 वा. पासून भरणे सुरु.

योजनांच्या सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा

  • अमरावती :- 0721 2661610
  •  मुंबई :- 022 4968558
  • औरंगाबाद :- 0240 2653595
  •  नागपूर :- 0712 256425
  •  कोल्हापूर :- 02312680009
  •  नाशिक :- 02532598685
  •  लातूर :- 02382 226680
  •  पुणे :- 020 35000454

मुख्यालय पत्ता :- औंध रोड, पशुसंवर्धन आयुक्तालया शेजारी, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411007. दूरध्वनी क्र. 020 35000450

शेतकऱ्यांना खूशखबर, केंद्र सरकारच्या या ऍप वरून मिळवा डिजिटल सातबारा, सरकारने केले नवीन अँप लॉन्च !

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !