Kusum Solar Yojana Meda | कुसुम सोलर पंप टप्पा-2 अर्ज सुरु, त्वरित तुमचा अर्ज भरा, पहा अधिकृत अपडेट व्हिडीओ सोबत !

Kusum Solar Yojana Meda :- शेतकर्‍यांसाठी गुड न्यूज, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महा ऊर्जा अंतर्गत कुसुम घटक ‘ब’ यासाठी टप्पा 2 हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या संदर्भातील अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेला आहे. टप्पा-2 हा 17/05/2023 तारखेपासून म्हणजे आज पासून हा टप्पा सुरू झालेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेती जमिनीुसार 3hp, 5hp, 7.5hp जे काही सोलर पंप आहे हे मिळणार आहे.

Kusum Solar Yojana Meda

परंतु नेमके आता हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ?. आणि या संदर्भातील अधिकृत माहिती या लेखात पाहणार आहोत. कुसुम सोलर पंप योजना ही राज्यात नवे तर देशभरात राबवली जाते, हे तुम्हाला माहीतच असेल.

परंतु या ठिकाणी महा ऊर्जा या अंतर्गत 90% आणि 95% या टक्क्यांमध्ये शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जातात. परंतु हे सोलर पंप शेतजमिनी नुसार देण्यात येतात. आणि या प्रवर्गसाठी म्हणजेच ओपन, ओबीसी, एनटीसी, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासाठी स्व-हिस्सा किती भरावा लागतो ?.

पीएम कुसुम सोलर पंप योजना 

अर्थातच 3 एचपी 5 एचपी आणि 7.5 एचपी पंप करिता स्व-हिस्सा किती आहे ? तर पाहूया. खुला प्रवर्ग यांच्यासाठी 10% हिस्सा :- 19,380 तीन Hp पंपासाठी. पाच एचपी 26,975, साडेसात एचपी च्या पंपांसाठी 37,440 रुपये स्व- हिस्सा असेल.

आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गांसाठी 5% हिस्सा आहेत. 9690 हे 3 एचपी पंपासाठी, 5 एचपी पंपासाठी 13,488 साडेसात एचपी पंपसाठी 18,720 असे या ठिकाणी लाभार्थी हिस्सा आहेत.

Kusum Solar Yojana Meda

येथे क्लिक करून पहा कोणत्या शेतकऱ्यांना किती hp पंप मिळतो ? 

Kusum Solar Pump Scheme

आता या ठिकाणी जर पाहिलं तर किती शेतजमीन धारकास किती एचपीचा पंप मिळतो ? आणि यासाठी ऑनलाइन अर्ज कसे करायचे आहेत ? याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. आणि याचे अधिकृत अपडेट हे लोकमत न्युज पेपर सोलापूर याअंतर्गत माहिती देण्यात आलेली आहे.

आणि यासाठीच हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आणि या संबंधित महाउर्जाचे महासंचालक यांनी याबाबत अपडेट दिले आहे. अशाप्रकारे कुसुम सोलर टप्पा 2 हा आता राज्यात सुरू झालेला आहे. 17 मे 2023 पासून तर अशा प्रकारचे ही शेतकऱ्यांसाठीच दिलासा देणार अपडेट आहे. कुसुम सोलर पंप साठीचे अर्ज सुरू झालेले आहेत.

Kusum Solar Yojana Meda

नवीन सिंचन विहीर सोबत सोलर पंप मिळणार पहा हा जीआर 

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा अपडेटसाठी 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

2 thoughts on “Kusum Solar Yojana Meda | कुसुम सोलर पंप टप्पा-2 अर्ज सुरु, त्वरित तुमचा अर्ज भरा, पहा अधिकृत अपडेट व्हिडीओ सोबत !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !