Kusum Yojana 2022 Maharashtra | कुसुम सोलर पंप योजना या जिल्ह्यात नवीन कोटा आला ९५% अनुदान करा ऑनलाईन अर्ज

Kusum Yojana 2022 Maharashtra

Kusum Yojana 2022 Maharashtra :- नमस्कार शेतकरी बांधवांनो कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत फक्त या 16 जिल्ह्यात नवीन कोटा उपलब्ध आहेत. आपण कुसुम सोलर पंपसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. कुसुम सोलर पंपाचे कोणत्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती अनुदान देण्यात येते.

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा व कुसुम सोलर पंप योजनासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात. व कोणत्या जमीन धारकास म्हणजेच किती जमीन धारकास कितीही एचपीचा पंप पंप हा दिला जातो. या बद्दल संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेली आहे. तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा संपूर्ण माहिती आपल्याला या एकाच लेखांमध्ये मिळणार आहेत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kusum Yojana 2022 Maharashtra

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 3 एचपी ते 7.5 एचपी पर्यंत सोलर पंप हे 90% ते 95% टक्के अनुदानावर दिले जातात. या कारणांमुळेच सोलर पंप योजनेचा कोटा लवकर उपलब्ध होत नाही. परंतु सध्या या 16 जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलर पंप योजनेसाठी कोटा उपलब्ध आहेत. तर कोणती 16 जिल्हे आहेत पुढील प्रमाणे आपण पाहू शकता.

अकोला, वर्धा, ठाणे, अमरावती, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पालघर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर. या 16 जिल्ह्यात कुसुम सोलर पंपचा कोटा उपलब्ध आहे. आपण या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर लगेच ऑनलाईन अर्ज सादर करा. ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा आहे. त्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊनच अर्ज करायचा आहे.

कुसुम सोलर पंप अनुदान व दर 

सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लाख (3 HP), रु. 2.225 लाख (5 HP),  रु. 3.435 लाख (7.5 HP). पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण प्रवर्ग लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या.

किंमतीच्या 10 % व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % लाभार्थी हिस्सा राहील. या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे 30 टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के हिस्सा लागणार.

कुसुम सोलर पंप कागदपत्रे

7/12 उतारा, विहिर,कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल.

आधारकार्ड झेरॉक्स प्रत, रद्द केलेली धनादेश प्रत/बँक पासबुक प्रत. पासपोर्ट आकाराचा फोटो. शेत जमीन व विहिर पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

Kusum Yojana 2022 Maharashtra

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा शासन निर्णय 

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवड पात्रता

शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.

अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार. 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC. व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे (kusum solar pump yojana) सौर कृषी पंप देण्यात येते.

हेही वाचा; नवीन सोलर पंप 3 लाख 25 हजार रु. अनुदान योजना सुरु पहा येथे शासन निर्णय GR 

कुसुम सोलर पंप कोणाला किती hp चा मिळतो ? 

PM कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एचपी, 5 एचपी व 7.5 एचपी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% टक्के. अनुदानावर सौर कृषीपंप दिले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज सादर कसा करावा पहाण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ नक्की पहा.


Kusum Yojana 2022 Maharashtra | कुसुम सोलर पंप योजना | kusum solar pump yojana | kusum solar pump yojana | कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म 2022

📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Kusum Yojana 2022 Maharashtra | कुसुम सोलर पंप योजना या जिल्ह्यात नवीन कोटा आला ९५% अनुदान करा ऑनलाईन अर्ज”

  1. Pingback: Vanya Prani Nuksan Bharpai | Nuksan Bharpai, वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 26 दिवसांत खात्यावर, सरकारचा नि

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top