Land Measurement By Gps | जमीन मोजणी होणार आता जीपीएस ने ! पहा सविस्तर माहिती

Land Measurement By Gps
Rate this post

Land Measurement By Gps: नमस्कार शेतकरी बंधूंनो जवळजवळ सर्व शेतकरी ही कोणत्या आणि कोणत्या कारणामुळे शेतावरून भावा भावामध्ये भांडण करत असतात. आणि असे भांडण झाल्यानंतर जर जमीन मोजणी करायची असली तर आपल्याला मनुष्यबळ लागते. त्यासाठी आपण सरकारी मोजणीसाठी पैसे ही भरावी लागते.

तर या सर्व अडचणींना दूर करण्यासाठी ही एक नवीन जमीन मोजणी यंत्र हे विकसित केले आहे. जे यंत्र जीपीएस द्वारे आपल्या जमिनीची अचूक मोजणी करणार आहे. तर हे जीपीएस यंत्र कसे काम करते याविषयी आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

Land Measurement By Gps

जमीन मोजणीसाठी (Land Survey) होणारा विलंब, विविध अडचणींचे सावट आता दूर होणार आहे. यासाठी जिल्ह्यात थेट ईटीएस स्टेशनचा (ETS Station) वापर करण्यात येणार आहे. यात जीपीएस यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याने भूमापन अचूक आणि सहापट जलदगतीने होणार आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील जमिनी मोजमापाला गती मिळणार आहे.

पारंपरिक पद्धतीने जमिनीचे मोजमाप

पारंपरिक पद्धतीने जमिनीचे मोजमाप करताना पूर्ण दिवस किंवा अधिक कालावधी लागतो. त्यातच अनेक अडचणी येत असतात, त्यामुळे पुढील कार्यवाही करण्यास उशीर होत असतो. जीपीएसचा वापर केल्याने अल्प कालावधीत जमीन मोजणी प्रक्रिया करून भूमापन करण्यासाठी रोव्हर पद्धत वापरली जाऊ शकते.

काय होणार फायदे 

त्यासाठी निरंतर संचलन केंद्र प्रत्येक तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालय आहे, पण मनुष्यबळाची कमतरता असल्याने अनेकदा जमिनीची मोजणी लांबणीवर पडते, तर जमीन मालकांना मोजणीसाठी कार्यालयात खेपा माराव्या लागतात. मात्र आधुनिक पद्धतीमुळे जिल्ह्यातील भूमापन करणे सहज शक्य होणार आहे.

तसेच मोजणी करताना अचूक क्षेत्रफळ निश्चित करता येणार आहे. यामुळे निरीक्षण, नोंदी व नकाशे शक्य होणार आहे. यामुळे मोजणी काम सुरू केल्यावर पाच ते सहापट जलद गतीने काम पूर्ण होणार आहे. या यंत्रणेच्या वापरामुळे प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत.

पारदर्शकता

मनुष्यबळाचा ताण कमी होणार

जीपीएसच्या रोव्हर मशीनमुळे काम अचूक

दर्जा उंचावेल, काम जलद

मोजणीच्या कामात पारदर्शकता

जमिनीचे अक्षांश, रेखांश मालकांना उपलब्ध

पारंपरिकपेक्षा सहापट अधिक गतीने मोजणी

जमिनीची मोजणी करताना अचूक क्षेत्रफळ निश्चित करता येणार

जीपीएस आधारित रोव्हर पद्धतीमुळे जमिनीची मोजणी करणे शक्य होणार आहे. यासाठी केंद्र उभारली जाणार आहेत. मनुष्यबळ कमतरतेवर मात करण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top