Land Purchase Scheme :- आज या लेखांमध्ये शासनाची महत्त्वाची योजनाची माहिती पाहणार आहोत. जमीन खरेदीसाठी शासनाकडून जिरायती शेतीसाठी एकरी 4 लाख रुपये तर बागायती क्षेत्रासाठी एकरी 8 लाख रुपये अनुदान हे शासनाकडून देण्यात येत आहे.
आता या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो ?, कोण या योजनेसाठी पात्र ठरतो ?, कागदपत्रे कोणती लागतात नेमकी या संदर्भातील सविस्तर माहिती लेखात पाहूया. शासनाकडून 4 एकर जिरायती जमीन आणि 2 एकर बागायती जमिनीसाठी योजनेचा आपण लाभ घेऊ शकतात.
Land Purchase Scheme
या योजनेचा विचार केला सन 2018 मध्ये या योजनेत काही बदल करण्यात आले आहे.चार एकर जिरायती जमीन आणि दोन एकर बागायती जमिनीसाठी या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदान आता देण्यात येत आहे. क्षेत्रासाठी 4 लाख रुपये
प्रति एकर तर 4 एकरीसाठी 16 लाख रुपये अनुदान, आणि बागायती क्षेत्रासाठी प्रति एकर आठ लाख रुपये म्हणजेच दोन एकर साठी 16 लाख रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.
शेत जमीन खरेदी अनुदान योजना 2023
शेतजमीन खरेदी योजनेसाठी काही नियम अटी शर्ती आहेत, ज्या खाली दिलेल्या आहेत त्या आपण पाहू शकता. योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती जमाती घटकातील लाभार्थी यांच्यासाठी प्रामुख्याने राबवली जात आहे. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
विधवा तसेच भूमीहीन लाभार्थी सुद्धा योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतात. लाभार्थीच्या गावांमध्ये जमीन खरेदीसाठी विक्रीसाठी करण्यात आलेले आहे. ज्या गावात जमिनीसाठी आपण अर्ज करत आहात त्याच गावाचा रहिवासी असणं आपल्याला आवश्यक आहे.
येथे टच करून पहा कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरु आहेत ?
शेत जमीन अनुदान योजना
अर्जदाराची वय कमीत कमी 18 जास्तीत जास्त साठ वर्षे असण आवश्यक. 60 वर्ष पेक्षा जास्त वय असेल तर अशा जमिनीची खरेदी संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने केली जाते.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करणे गरजेचे असते. हे योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन विक्री करायची असेल तर त्याला देखील एक प्रस्ताव सादर करावा लागतो.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
ज्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यायचा अशा शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत शेतजमीन घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. यामध्ये अर्जदारचे नाव, संपूर्ण पत्ता, तसेच जात, अर्जदाराची जन्मतारीख, इत्यादी विचारली सगळी माहिती आपल्याला द्यावी लागते.
शेत जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे
- जातीचे दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- भूमिहीन शेतमजूर असल्याचा तलाठीकडील प्रमाणपत्र
- दारिद्र्यरेषेखालीची कार्ड
विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास त्याचा पुरावा तो पतीची मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. त्याबरोबरची सत्यप्रत आणि जमीन नसल्याबाबतचा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावे लागतात.
शेत जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे
तसेच संपूर्ण राज्यामध्ये जिल्हानिहाय लक्षाक देखील उपलब्ध करून दिले जातात व त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामधून अर्ज मागविले जातात. यामध्ये आता लक्षांक उपलब्ध असलेल्या नागपूर, गडचिरोली
राज्यातील इतर विविध जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात आले आहेत. सन 2022-23 मध्ये या योजने करता 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती.
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान 2022 योजना सुरु :- येथे पहा