Land Rates in Maharashtra | Land Record आपल्या जमिनीचे,प्लॉट चे सरकारी भाव पहा ऑनलाईन नवीन वेबसाईट सुरु

Land Rates in Maharashtra

Land Rates in Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतजमीन चे सरकारी भाव म्हणजेच आपल्या जमिनीचे एकरी किंवा जे सरकारी भाव (Land Rates) असतात. हे ऑनलाइन पद्धतीने आपल्याला कसे पाहता येणार आहे. जेणेकरून आपल्या जमिनीचे सरकारी भाव काय आहेत. हे आपल्याला पाहता येणार आहे, आणि ही कशी पहायचे यासाठी आपल्याला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे. या लेखांमध्ये संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. आपण ऑनलाईन पद्धतीने Government Land Rates हे आपण पाहू शकता.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Land Rates in Maharashtra

गावातील जमिनीचा सरकारी दर

 1. जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला igrmaharashtra.gov.in असं सर्च करायचं आहे.
 2. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
 3. या वेबसाईटवर डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रकाना दिसेल. यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
 4. यानंतर बाजारमूल्य दर पत्रक नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल.
 5. आता आपल्याला ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे, त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करायचं आहे.
 6. आता मला माझ्या जिल्ह्यातील जमिनीचे शासकीय भाव पाहायचे आहेत, त्यामुळे मी या नावावर क्लिक केलं आहे.
 7. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
 8. या पेजवर सगळ्यात आधी डावीकडे Year या रकान्यात तुम्हाला वर्षं निवडायचं आहे.
 9. आता मला चालू वर्षासाठीचे दर पाहायचे असेल मी 2021-22 हे वर्षं निवडलं आहे.
 10. इथं उजवीकडे असलेल्या Language या रकान्यात जाऊन तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
 11. त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याचं नाव दिसून आपोआप आलेलं दिसेल.
 12. पुढे तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
 13. गावाचं नाव निवडलं की खाली तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसतील.

Land Rates in Maharashtra

हेही वाचा; Pm घरकुल योजना करिता नवीन ऑनलाईन फॉर्म सुरु येथे क्लिक करून करा अर्ज लगेच 

Land Government Valuation

शेत जमिनीचे सरकारी भाव कसे पहायची ? :- यात सुरुवातीला (Assessment type) मध्ये जमिनीचे प्रकार दिसतील. या प्रकारानुसार पुढे (Assessment range) आणि रेट म्हणजेच जमिनीचा सरकारी भाव दिलेला असेल. ही जी किंमत इथं दिलेली असते ती प्रतीहेक्टरी असते. अशाप्रकारे जिरायत, बागायत, एमआयडीसी अंतर्गत येणारी जमीन, हायवेवरील जमिनी याचे सरकारी दर तुम्ही इथं पाहू शकता. पण, आता हे पाहताना तुमच्या मनात ही म्हणजे काय भानगड आहे हा प्रश्न आला असेल. कारण इथं (Assessment range) नुसार जमिनीचे भाव कमी किंवा जास्त होताना दिसतात.

Land Government Valuation

हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु पहा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म 

Assessment Range of Land

Assessment range म्हणजे तुमच्या जमिनीचा प्रतिहेक्टरी आकार. मग ही Assessment range कशी काढायची, तर ते आता समजून घेऊया.तुमच्याकडे तुमचा सातबारा उतारा असेलच. त्यात संबंधित शेतकऱ्याच्या नावासमोर त्याच्याकडे असलेलं जमिनीचं क्षेत्र आणि त्यापुढे आकार दिलेला असतो. आता माझ्या वडिलांकडे 1.26 हेक्टर आर जमीन आहे आणि आकार आहे 4.94 रुपये. Assessment range, काढण्यासाठी तुम्हाला आकार भागिले क्षेत्र असं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे इथं 4.94 भागिले 1.26. यानुसार Assessment range आली 3.92. एकदा का ही Assessment range काढली, की मग ती कोणत्या रेंजमध्ये बसते. ते पाहून गावातील जमिनीचा सरकारी भाव जाणून घेऊ शकता.


📢 फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 शेतकरी योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top