Land Records Maharashtra Proof | शेतकऱ्यांनो तुमच्याकडे शेतजमीन आहेत, पण हे 7 कागदपत्रे तुमच्या नावावर असेल तरच तुम्ही मालक, आताच पटापट चेक करा तुमच्या नावावर आहेत का ?

Land Records Maharashtra Proof :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जमीनधारक किंवा शेतकरी असाल तर हा आर्टिकल तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आज अशी माहिती जाणून घेणार आहोत जी फारच कमी शेतकऱ्यांना हा नियम किंवा कायदा माहित आहे.

याची माहिती सर्व शेतकऱ्यांना व्हावी यासाठी हा आर्टिकल लिहिण्यात येत आहे. हा आर्टिकल इतर शेतकरी बांधवांना किंवा जमीनदार त्यांना शेअर करा. शेत जमिनी संबंधीतील 7 कागदपत्रांची माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुम्हाला अजून गरजेच आहे.

कारण जर तुमच्याकडे की 7 कागदपत्रे नसेल तर तुम्ही स्वतः जमिनीचे मालक नसतात. यासंबंधीतील नेमका कायदा काय आहे ? ही माहिती पाहणार आहोत. सध्या बऱ्याच वेळा जमिनीसंबंधीत आणि कुटुंबामध्ये भावाभावांमध्ये अनेक प्रकारचे वाद घडून येतात. अशावेळी अनेक प्रकारचे वाद हे घडून येतात.

Land Records Maharashtra Proof

1) Satbara Records :- सर्व शेतकरी किंवा जमीन धारकांना माहिती असते ती म्हणजे सातबारा उतारा हा शेत जमिनीचा एक आरसा असतो. जो जमिनीच्या मालकी हक्काचा पुराव्याच्या बाबतीत विचार केला तर एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. या माध्यमातूनच संबंधित शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे किती पोटखाराबा जमीन आहे ? किंवा किती लागवडी योग्य जमीन आहे ही माहिती त्यात दिसून येत असते.

2) 8 अ खाते उतारा किंवा आठ चा उतारा

बरेचदा शेतकऱ्यांची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये असते. आणि सगळ्या गट क्रमांक मध्ये असलेले शेत जमिनीची माहिती ही एकत्रपणे आठ अ उतारा या माध्यमातून दिली गेलेली असते. म्हणजेच गावामध्ये तुमच्या मालकीची शेत जमीन कोण कोणत्या गटात आहे ? किती जमीन आहे याची सर्व माहिती तुम्हाला आठ अ उताराच्या माध्यमातून समजून येते.

Land Records Maharashtra

📒 हेही वाचा :- तुमच्या राशन कार्ड आहेत का ? मग असे मिळवा मोफत 5 लाख रु. शासनाने सुरू केली ही खास योजना पहा तुम्ही आहेत का पात्र ?

3) जमिनीचे खरेदीखत

जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो, तेव्हा संबंधित जमिनीचे मूळ मालकी किंवा मूळ मालक कोण आहे ? हे सिद्ध करण्यासाठी खरेदीखत खूप महत्त्वाचे ठरते. खरेदी खत जमिनीचा मालकी हक्काचा प्रथम पुरावा मानला जातो. आणि सोबतच खरेदी खतामध्ये जमिनीचे व्यवहार किती

तारखेला झाला कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला तसेच अगोदरचा मालक कोण ? आता खरेदी करून घेत असलेल्या मालक याबद्दलची सगळी माहिती खरेदीखतावर केलेली असते. खरेदीखत झाल्यानंतर संपूर्ण माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाचे नोंद होत असते.

4) जमिनी मोजणीचे नकाशे पुरावा

जमिनीचे मालकी संदर्भात काही वाद उद्भवले तर जमीन मोजणी करायची वेळ येते. अशावेळी प्रामुख्याने जमिनीचे हद्द विषयी वाद वाढल्यावर जमिनीची मोजणी केली जाते. तर अशा कारणांमध्ये तुमच्याकडे जमिनीची मोजणी नकाशे असणे गरजेचं आहे.

Land Records Maharashtra

📒 हेही वाचा :- पर्सनल आणि गोल्ड लोन सोडा, येथे मिळतंय सर्वात स्वस्त लोन; पाहा किती आहे व्याजदर, किती व्याजदर ? वाचा डिटेल्स !

5) जमीन महसूल भरल्याचा पावत्या

जमीन महसूल प्रत्येक वर्षीला भरावा लागतो. तो तलाठ्याकडे भरल्यानंतर त्यांच्याकडून पावत्या दिल्या जातात. हा महसूल भरल्याच्या पावत्या देखील जमिनीची मालकी हक्काबाबत महत्त्वाचा पुरावा ठरतो.

6) एखाद्या जमिनीची पूर्वीचे खटले तर एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि त्या जमिनीबाबत जर अगोदरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा खटला किंवा केस कोर्ट मध्ये सुरू असेल तर अशावेळी केसची कागदपत्रे व त्यातील जबाबदाच्या प्रती निकालाच्या इत्यादी कागदपत्र जपून ठेवणे गरजेचे असते. या पद्धतीची कागदपत्रे देखील भविष्यामध्ये तुमच्या जमिनीवर मालकी दावा करण्यासाठी उपयोगात पडू शकतात.

7) प्रॉपर्टी कार्ड

प्रॉपर्टी कार्ड म्हणजे जमीन बिगर शेती आहे, आणि या जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर अशा ठिकाणी बिगर शेती जमिनीवर तुम्हाला मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा असतो. तो म्हणजे प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी कार्ड अगदी सातबारा उताऱ्याप्रमाणे

एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती शेतजमीन आहे यासारखे माहिती या प्रॉपर्टी कार्डवर असते. किती जमीन बिगर शेती आहे ही देखील प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून समजते. अशा प्रकारचे हे 7 मूळ कागदपत्र आहेत, हे तुमच्या नावावर आहेत, किंवा नाही हे पाहण्यासाठी सातबारा उतारा, 8 अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड हे चेक करावे लागेल. ही संपूर्ण कसे चेक करावे ? याचा व्हिडीओ खाली दिलेला आहेत. तो व्हिडीओ संपूर्ण पहा धन्यवाद…..

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !