Laptop Scheme For Students | Government Scheme | अरे वा ! आता या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजना सुरु, अर्जाची ही शेवटची तारीख पहा खरी माहिती

Laptop Scheme For Students

Government Scheme :- मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी विविध योजना (Scheme) राबवल्या जातात. (laptop scheme) त्याचप्रमाणे पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरावरसुद्धा विविध योजना राबवल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अशाच एका शैक्षणिक योजनेबद्दलची (Education Scheme) माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

जिल्हा परिषद मोफत लॅपटॉप योजना

हिंगोली जिल्ह्यातील वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक सहाय्य (Financial Support) देण्याचे ठरवण्यात आलेले असून ही योजना स्थानिक पातळीवर सुरू आहे त्यासाठीचे अर्ज अर्जदाराकडून मागविण्यात येत आहेत.

यासाठी विद्यार्थ्यांना विहित मुदतीत म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत संबंधित जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा लागेल. अशी माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्यामार्फत देण्यात आली आहे. (Laptop Scheme For Students)

सूचना : ही योजना संबंधित जिल्हामार्फत राबवली जात आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये या योजनेससंदर्भातील अधिक माहिती तुम्ही जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाशी संपर्क करून मिळवू शकता.

Laptop Scheme For Students
Laptop Scheme For Students

पात्रता व विद्यार्थी निकष

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • विद्यार्थी ST, SC, SBC, VJNT या प्रवर्गातील असावा
  • वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रथम वर्षात दाखला असावा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

  • विद्यार्थ्यांचा आधारकार्ड (Aadhaar Card)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक झेरॉक्स (Bank Passbook)
  •  विद्यार्थी चालू वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पदवीची कागदपत्रे
  • कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याबाबतचा बोनाफाईड प्रमाणपत्र
  •  दहावी, बारावी, जेईई, NEET गुणपत्रिकेची सत्यप्रत
लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य किती ?

अर्ज केल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळेल अशी बाब नाही; कारण यासाठी मर्यादित उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून फक्त 80 विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी 30 हजार रुपये इतक्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य देण्यात येईल.

अर्ज कसा व कुठे करावा ?

विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लॅपटॉप मिळवण्यासाठी किंवा लॅपटॉप सुविधा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या भरून सर्व कागदपत्रासह जोडून संबंधित विभागाकडे दाखल करावा लागेल. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.

अधिकृत माहिती येथे पहा 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा

1 thought on “Laptop Scheme For Students | Government Scheme | अरे वा ! आता या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजना सुरु, अर्जाची ही शेवटची तारीख पहा खरी माहिती”

  1. Pingback: शेत, प्लॉट, जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन मोबाइलवर : Online Land Record Maharashtra

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top