Light Trap for Agriculture :- आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण आणि कामाची माहिती शेतकरी बांधवांसाठी पाहणार आहोत. सध्या शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात पादुर्भाव पाहायला मिळत असतो. कारण सध्या पावसाचं वातावरण असून, पाऊस कधी पडत नाही तर कधी मुसळधार पडतो,
आणि कधी रिमझिम पाऊस असतो. अशावेळी कीड पिकांना मोठ्या प्रमाणात लागते, आणि ही कीड नियंत्रण कशा पद्धतीने करावी लागते ? याची माहिती आज पाहणार आहोत. प्रकाश सापळ्यांच्या मदतीने कमी खर्चात किड नियंत्रण करता येतं.
Light Trap for Agriculture
हे पिकांचे कीड नियंत्रण कसं करायचं ? नेमकी प्रकाश सापळा नेमकी काय ? Light Trap हे लेखांमध्ये पाहणार आहोत. शेती करत असताना भाजीपाल्याचे फळपिकांचे तसेच फुलपिकांचे किडे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते. आणि यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट असते.
काही वेळा किडी संपूर्ण पीक नाहीसे करते, आणि यामुळे शेतकरी हातबल होतो. आणि शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट उभे राहते. अशावेळी शेतकऱ्यांना ही लाईट ट्रॅप म्हणजेच कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळा वरदान ठरतोय. आणि कशा पद्धतीने कीड नियंत्रण हे प्रकाश सापळा (लाईट ट्रॅप) करतो हे या ठिकाणी पाहणार आहोत.
प्रकाश सापळा / Light Trap
किडीने त्रस्त झाला असाल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. पिकांतील कीड येण्याच्या कालावधीमध्ये जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवर एक लाईट लावा. त्याच्या अर्धा ते एक फुट खाली पाण्याचे भांडे ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही प्रकाश सापळा तयार करू शकता.
याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. रात्रीच्या वेळी ब्लबच्या प्रकाशाकडे कीटकांची आकर्षण होईल, यावेळी सुरुवातीला कीटकच्या प्रकाशाने लाईटभोवती फिरतील. आणि त्यानंतर ब्लब खाली ठेवलेल्या पाण्याला स्पर्श होताच त्यामध्ये बुडून मरतील.
📒 हेही वाचा :- शेतातील तणांचा नायनाट करणार आता हे आधुनिक यंत्र, पण कसे ? वाचा डिटेल्स व पहा किंमत !
प्रकाश सापळा तंत्रज्ञान
अशा प्रकारे किडीचे नियंत्रण मिळवणे तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीचे आणि चांगले आहेत. प्रकाश सापळा बनवून झाल्यावर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामध्ये सापळ्यातील ब्लब चालू ठेवण्यासाठी वेळ रात्री 7 ते 10 वाजता, ब्लॉक चालू ठेवा त्यानंतर ब्लब बंद करा.
त्यानंतर रात्री उशिराने कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि पाण्यात बुडून मरतात. त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा त्यातून होईल. आणि महत्त्वाचे बाजारामध्ये देखील विविध प्रकारचे सापळे उपलब्ध आहेत. तसेच सोलर शक्तीवर चालणारे स्वयंचलित प्रकाश सापळा ही बाजारात मिळतात.
त्याचा उपयोग करून देखील तुम्ही कीड व नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही घरगुती पद्धतीने देखील सापळा बनवायचा प्रयत्न केला तर देखील ते तुम्ही बनवू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अशाप्रकारे प्रकाश सापळा तयार करून कीड नियंत्रण मिळवू शकतात. हे अपडेट कसे वाटले नक्की कळवा व इतर शेतकऱ्यांना हा लेख शेअर करा.
📒 हेही वाचा :- आता असो किंवा नसो आतच घरी घेऊन या हे सोलर पॅनल लाईट्स, रात्री ऑटोमॅटिक चालू आणि दिवसा ऑटोमॅटिक बंद किंमत ही कमी !