Mahadbt Farmer Registration | महाडीबीटी पोर्टल नोंदणी ते लॉगिन, अनुदान,कागदपत्रे, योजनेची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी वाचा संपूर्ण माहिती !

Mahadbt Farmer Registration :- आज या लेखात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टलची सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. Mahadbt Farmer Portal काय आहे ?, महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉगिन कसे करायचे

आहे ? Mahadbt Farmer नोंदणी कसे करायचे आहेत ?. त्याचबरोबर महाडीबीटी फार्मर हे काय आहे ? आणि यावर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे ? याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Mahadbt Farmer Registration

महाडीबीटी फार्मर हे राज्य शासनाचं पोर्टल असून या पोर्टलवर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ लाभ दिला जातो. Maha Dbt Portal वर 100 पेक्षा जास्त योजनांचा लाभ तुम्हाला घेता येतो. अर्थातच महाडीबीटी फार्मर पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी 100 पेक्षा जास्त योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

तुम्ही महाडीबीटी फार्मर पोर्टल विविध योजना, जसे विहीर, शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कांदा चाळ, पॉलिहाऊस, शेडनेट, असे विविध 100 योजनांचा लाभ एकाच पोर्टलवरून घेऊ शकतात. यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल हे सुरू केलेला आहे.

महाडीबीटी फार्मर पोर्टलवर नोंदणी

महाडीबीटी फार्मर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काही पुढील स्टेप फॉलो करायला लागतात. यासाठी तुम्हाला Mahadbt portal अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर उजव्या बाजूस नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करून नवीन नोंदणी हे संपूर्ण करून घ्यायचे आहे.

फोटोमध्ये दिलेली माहिती आहे त्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा आणि Mahadbt Farmer Registration हे करून घ्या. त्यानंतर तुम्हाला माहिती समजत नसल्यास वापर करता शेतकरी वापर करता पुस्तिका या पर्यावर क्लिक करून तुम्ही महाडीबीटी फार्मर पोर्टलवर नोंदणी कशी करू शकता ही माहिती मिळवू शकता.

महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करायची ही माहिती तुम्हाला व्हिडिओ द्वारे पाहायची असल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी शेतकरी पोर्टल नोंदणी ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे जाणून घेतले आहेत. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल वरून किंवा कॅम्पुटर वरून नोंदी करू शकता.

योजनेचे नाव (योजना कोणाची) ? महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना (Mahadbt Farmer Scheme)
महाडीबीटी पोर्टल कोणी सुरु केले ? महाराष्ट्र शासन (MH GOV)
महाडीबीटी पोर्टल नोंदणी कशी करावी ? महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून शकता.
Mahadbt Farmer Registration https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
Mahadbt Farmer Portal Login https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/
महाडीबीटी ट्रॅक्टर योजना अनुदान किती मिळते ? ट्रॅक्टर योजनेसाठी SC,ST यांना 50% आणि ओपन,ओबीसी, इतर 40% अनुदान मिळते.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल

यावर शेतकरी बांधवांना विविध योजना जसे कृषी यांत्रिकीकरण, त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन विभाग योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, त्यानंतर राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो. आता Mahadbt Farmer Portal Login कसे करावे ?.

महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला अगोदर नवीन नोंदणी अर्थात नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं. यासाठी सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर तुम्हाला नवीन अर्जदार म्हणून हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लीक करून नवीन अर्जदार नोंदणी करून घ्या.

नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे तरी कागदपत्रे कोणती आहे हे पाहूयात. आता महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे जो तुमचा आधार नंबर आहे या आधार नंबर ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही याप्रकारे महाडीबीटी पोर्टलवर login करू शकता.

Mahadbt Farmer Registration

📋 हेही वाचा :- कुसुम सोलर पंप योजना मोबाईल मधून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? पहा कागदपत्रे, कोटा, ऑनलाईन फॉर्म संपूर्ण प्रोसेस

महाडीबीटी फार्मर पोर्टल नवीन रजिस्ट्रेशन

नवीन नोंदणी करणे हे एकदम सोपी पद्धत आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्याकडे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्यानंतर बँक खाते देखील असणे गरजेचे आहे. आणि तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक देखील असणं गरजेचं आहे. तुमचा मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर तुम्ही जवळच्या आधार केंद्र वर जाऊन लिंक करू शकता.

किंवा जवळचे सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही बायोमेट्रिक डिव्हाइसने रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला खालीलपैकी प्रक्रिया करावी लागते. सर्वप्रथम महाडीबीटीच अधिकृत पोर्टल ओपन करा. त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी यावर पर्यावर क्लिक करा.

नवीन फॉर्म तुम्हाला ओपन होईल त्यात सर्वप्रथम आपली संपूर्ण नाव, वापरकर्ता, आधार कार्ड नंबर, पासवर्ड टाकावा लागेल. तुमचा सुरू असलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकून

कॅपच्या पुढे टाकून नोंदणी वर क्लिक करावे लागेल. आपली अशा प्रकारे नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तुम्ही Mahadbt Farmer Registration वर अशाप्रकारे नोंदणी करू शकतात. व नंतर लॉगिन करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

Mahadbt Farmer Scheme List

महाडीबीटी फार्मर पोर्टल योजनेअंतर्गत विविध 100 पेक्षा जास्त योजना शेतकरी बांधवांसाठी वर्षभर राबवण्यात येत असतात. यामध्ये विविध शेतकरी अर्ज करून लाभ घेतात आणि असे लाभ घेतलेले शेतकरी अर्थातच अर्ज केलेले शेतकऱ्यातून ज्या शेतकऱ्यांची निवड होते.

अशा शेतकऱ्यांची यादी किंवा नोंदणी किंवा निवड झाल्याची माहिती ही शेतकऱ्यांच्या मोबाईल, ईमेल आयडीवर किंवा तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट पोर्टल वरती चेक करावे लागतात. आता Mahadbt Farmer Farmer Lottery पोर्टल वरती तुमची निवड झाली आहे का हे कसे चेक करायचा आहे ?.

यासाठी तुम्ही तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्ड हा टाकून तुम्हाला साइन अप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे विविध माहिती मिळेल, त्यावर क्लिक करून जाणून घेऊ शकता, की तुमची निवड झाली आहे किंवा नाही. अशाप्रकारे तुम्ही Mahadbt Farmer Scheme List ही पाहू शकता.

Mahadbt Farmer Registration

📋 हेही वाचा :- मोबाईलमधून डिजिटल मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे वाचा सविस्तर माहिती मराठीत !

महाडीबीटी फार्मर्स स्कीम काय आहे ?

महाडीबीटी फार्मर स्कीम हे पोर्टल राज्य सरकारकडून राबवली जाते. महाडीबीटी पोर्टल हे सुरू करण्याचा शासनाचा मुख्य उद्देश्य एकच आहे, तो म्हणजे शेतकरी बांधवांना कुठेही वेगवेगळ्या पोर्टलवर नोंदणी करण्याची गरज नसून ती नोंदणी एकाच पोर्टलवर एकाच अर्जामध्ये

एकाच ठिकाणी व्हावी यासाठी शासनाचे महाडीबीटी पोर्टल हे सुरू केले आहे. महाडीबीटी फार्मर पोर्टल वर शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ यातून दिला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेन गण, इत्यादी जे काही बाबी आहे, यासाठी 45% ते 55% अनुदान देण्यात येते.

त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत 80 टक्के पर्यंत या दोन्ही योजना मिळून अनुदान ठिबक सिंचनासाठी देण्यात येते. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत ट्रॅक्टर पासून ते Power Tiler, बैलचलित, मनुष्य चलीत, फलोत्पादन, स्वयंचलित यंत्रे, असे विविध अवजारे/यंत्र, ट्रॅक्टर यासाठी अनुदान दिलं जातं.

या विविध बाबीसाठी 40% ते 50% आणि 55% ते 60% अशा प्रमाणात हे अनुदान शासनाकडून दिलं जाते. त्यानंतर बियाणे यासाठी देखील शासनाकडून अनुदान दिलं जाते. त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो.

Mahadbt Farmer Registration
Mahadbt Farmer Registration

📋 हेही वाचा :- फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, ‘हे’ डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क !, तुम्ही तर ही चूक नाही ना केली ?

Mahadbt Shetkari Anudan Yojana

जसे नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, नवीन बोरवेल, शेततळ्याच्या अस्तरीकरण, विज जोडणी, सूक्ष्म सिंचन, या बाबीकरिता शासनाकडून 100% अनुदान देण्यात येते. आणि त्याच पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, बोरवेल, त्यानंतर विज जोडणी, इतर बाबींसाठी 100% अनुदान देण्यात येते.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 100% अनुदानावर फळबाग लागवड, फुलबाग लागवड, मसाला पिके लागवड, यासाठी अनुदान दिलं जाते.

त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत देखील ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इत्यादीसाठी अनुदान दिलं जाते. या बाबींमध्ये इतर अधिक बाबी आहेत. तुम्ही या बाबी जाणून घ्यायचे असल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहू शकता.

Mahadbt Farmer Tractor

महाडीबीटी फार्मर ट्रॅक्टर योजनेसाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर portal वर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ते 23 रुपये अर्जसाठी आकारले जातात. या अर्जासाठी तुमच्याकडे जमीन असणे गरजेचे आहे, आधिक माहिती करिता तुम्हाला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ पाहायचा आहे.

त्या माध्यमातून तुम्हाला महाडीबीटी फार्मर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करता येतो ? याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे Mahadbt Farmer Scheme योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहेत धन्यवाद.

महा डीबीटी ऑनलाइन फॉर्म ?

महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अगोदर नोंदणी करावी लागेल, त्यांतर तुम्ही 100 योजनांचा लाभ घेता येतो, अधिकृत संकेतस्थळ :- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login यावर नोंदणी व ऑनलाईन फॉर्म भरा.

Mahadbt Farmer Login

महाडीबीटी पोर्टल वर आल्यावर Farmer Schemes वर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला login च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्ही तुमचा User ID आणि Password किंवा आधार क्रमांकाच्या मदतीने MahaDBT Farmer Yojana वर लॉग इन करू शकता

महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करावी ?

रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्याकडे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्यानंतर बँक खाते देखील असणे गरजेचे आहे. आणि तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक देखील असणं गरजेचं आहे. तुमचा मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर तुम्ही जवळच्या आधार केंद्र वर जाऊन लिंक करू शकता.

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना

महाडीबीटी फार्मर पोर्टल योजनेअंतर्गत विविध 100 पेक्षा जास्त योजना शेतकरी बांधवांसाठी वर्षभर राबवण्यात येत असतात.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !