Mahadbt Shetkari Yojna 2023 | शेतकरी अनुदान योजना 2023 | महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भराल ? घ्या जाणून लगेच !

Mahadbt Shetkari Yojna 2023 :– नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. शेतकरी मित्रांनो शेती करत असताना

शेतकऱ्यांना जसे पीव्हीसी पाईप मोटर बघतो डिझेल पंप या विविध बाबींची गरज ही जास्त भासत असते. याचाच विचार करता सरकारने यासाठी अनुदान देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.

Mahadbt Shetkari Yojna 2023

यासाठी राज्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी किती अनुदान आहे कागदपत्रे कोण कोणती लागतात.

ऑनलाईन अर्ज नेमकं कोणत्या पोर्टल वर सादर करायचा आहे. याविषयी सविस्तर संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण पहा या लेखात संपूर्ण माहिती लिहिलेले आहे.

शेतकरी अनुदान योजना 2023

मोटार पंप तसेच डिझेल पंप असेल असेल यासाठी ऑनलाईन अर्ज. करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट अर्थातच एक शेतकरी अनेक योजना

या पोर्टल वरती आल्यानंतर आपल्याला शेतकरी योजना हा पर्याय दिसेल. या पर्यायावर आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचन प्रती थेंब

अधिक सूक्ष्म सिंचन घटक. हा पर्याय दिसेल या पर्यावर ती आपल्याला क्लिक करायचा आहे. या वरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला लागणारी पात्रता,

कागदपत्रे, अनुदान, ही सविस्तर माहिती या ठिकाणी दिसून येईल. पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात.

📑 हे पण वाचा :- आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस

महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना

या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य

पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते. तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

पीव्हीसी पाईप,मोटार पंप योजना कागदपत्रे 

  • ७/१२ प्रमाणपत्र
  •  ८-ए प्रमाणपत्र
  •  वीज बिल
  •  खरेदी केलेल्या संचाचे बिल
  •  पूर्वसंमती पत्र

📑 हे पण वाचा :- गाडी चालवताना ही 5 कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा, अन्यथा 15,000 रुपयांचा दंड अणि होऊ शकते ही मोठी शिक्षा पहा कागदपत्रे लिस्ट !

महाडीबीटी अनुदान योजना पात्रता

  •  शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  •  शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही
  • जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
  • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  • शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
  • शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे,
  • ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !