Mahadbt Solar Pump Yojana | 100% अनुदानावर सौर कृषी पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु

Mahadbt Solar Pump Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. यासाठी आपण जर पाहिले तर 5 एचपी पर्यंत अनुदान आपल्याला देण्यात येणार आहे. आणि हे 100 टक्के अनुदान असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय तसेच कोणत्या प्रवर्गासाठी योजना आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण नक्की बघा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निम-शासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Mahadbt Solar Pump Yojana

वनहक्क कायदा २००६ अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने. तसेच शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता विहीर/बोअरवेल करुन सोलार पंप बसविणे ह्या दृष्टीकोनातुन. Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land given under FRA २००६ ही योजना केंद्र शासनास सादर करण्यात आली होती. सदर योजना केंद्र शासनाने विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत सन २०१५-१६ करीता संदर्भाधिन क्र.१ अन्वये मंजुर केली. असुन सदर निधी राज्य शासनास वितरीत करणेत आला आहे. 

सोलर पंप महाडीबीटी ऑनलाईन अर्ज कसा करावा 

वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता बोअरवेल/डगवेलची निर्मिती करुन सोलारपंप बसवुन शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातुन Bore well /dug well with solar pump (५ hp) for irrigation of land given under FRA २००६ “ही योजना सुरु केली गेली आहे. 

👉👉कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना 2022 👈👈

महाडीबीटी सोलर पंप अनुदान किती मिळते 

एकुण रक्कम बोरवेल/डगवेल २.५०,000/- सोलार पंप, पॅनल (4HP) २.३३.५९०/- एकूण ४,८३,५९०/- उपरोक्त नमुद बाबींकरीता ठरविण्यात आलेली. अनुदानाची मर्यादा ही शासनाच्या धोरणाप्रमाणे ठरविण्यात आलेले महत्तम मर्यादा आहे. योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रती लाभार्थी कमी खर्च येत
असेल तर त्याप्रमाणे अनुदान अदा करणेत येईल. शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांकात वाढ करण्याचे अधिकार मुल्यमापन व (Mahadbt Solar Pump Yojana) संनियंत्रण समिती असतील.

सोलर पंप योजना लाभार्थी निवड

कार्यपद्धती संनियंत्रन व मुल्यमापन समितीकडुन ठरविण्यात येईल. लाभार्थी निवड देखिल संनियंत्रन व मुल्यमापन समितीकडुन करणेत येईल व अंतिम यादीस शासनाची मान्यता घेण्यात येईल. योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक वनपट्टेधारक शेतक-यांसाठी पात्रतेचे निकष सदर समितीकडुन ठरविण्यात येतील. रहिवासी दाखला, जातीचा दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्ठा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र. यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र.

👉👉महाडीबीटी सोलर पंप योजना शासन निर्णय GR👈👈


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment