Mahadbt Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना | ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र

Tractor Anudan Yojna 2022

Mahadbt Tractor Anudan Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना. अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजने विषयी संपूर्ण माहिती आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  जसे ट्रॅक्टर खरेदी वर शेतकऱ्यांना अनुदान किती मिळेल. कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे तसेच योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. संपूर्ण माहिती या लेख मध्ये पाहणार आहोत.

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 

  •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल, तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभास पात्र राहील.

👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु👈👈

ट्रॅक्टर अनुदान योजना सन 2022 

मध्ये राबवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमध्ये 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी हे 2 प्रकार आहे. आणि त्याचमध्ये 8 Hp ते 70 Hp पर्यंत ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ही राज्यामध्ये सुरू झाली आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील प्रवर्ग साठी अनुदान पुढीलप्रमाणे 8 Hp ते 70 एचपी नुसार राहील. अनुसूचित जाती जमातीतील 8 एचपी ते 20 एचपी साठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.  टक्केवारी मध्ये 50% टक्के अनुदान असेल परंतु 1 लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान दिले जाणार नाही.

👉👉200 गाई पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु👈👈 

Mahadbt Tractor Anudan Yojana

20 Hp पेक्षा जास्त ते 40 एचपी पर्यंत अनुदान 1 लाख 25 हजार रुपये दिले जाणार आहे. 40 पेक्षा जास्त ते 70 एचपी पर्यंत ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपये अनुदान असणार आहे. यापेक्षा जास्त अनुदान आपणास देय नाही. 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी यामध्ये अनुदान सारखेच आहे. कोणत्या अवजारासाठी, कोणत्या ट्रॅक्टरसाठी किती एचपी ट्रॅक्टरसाठी, कोणते यंत्रसाठी किती अनुदान आहे. याबाबतची सरकारने दिलेली पीडीएफ फाईल पाहण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर पहा.

ट्रॅक्टर अनुदान कसे व किती मिळेल खाली दिलेल्या माहितीवर जाणून घ्या 👈👉 येथे क्लिक करा


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार :- येथे पहा 

1 thought on “Mahadbt Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना | ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र”

  1. Pingback: Mahadbt Krushi Yantrikikaran | कृषी यांत्रिकीकरण योजनेत 40+ योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !