Mahagramin Baliraja Tarnhar Yojana | थकीत कर्जात 75% सवलत लगेच लाभ घ्या

Mahagramin Baliraja Tarnhar Yojana : नमस्कार सर्वाना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना सुरू झाली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत नवीन योजना शेतकऱ्यांसाठी तसेच थकित कर्जदारांची सुरू केली आहे. त्याचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बळीराजा तारणहार योजना अभिनव योजना असे म्हणण्यात आले.

या योजनेची घोषणा बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकरी आणि थकीत थकीत कर्जदार साठी महाग्रामीण बळीराजा तारणहार ही अभिनव योजना सुरू केली. सदर योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना 1 जानेवारी ते 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज परतफेड केल्यास त्यांना व्याजावर 60 ते 75 टक्के सवलत मिळणार आहे. सदर योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहिती आपण पाहू शकता.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकरी आणि थकीत कर्जदारांसाठी महाग्रामीण बळीराजा तारणहार ही अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेतर्गत थकीत कर्जदारांना १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ दरम्यान कर्ज परतफेड केल्यास. त्यांना व्याजावर ६० ते ७५ टक्के सवलत मिळणार आहे.

तसेच खातेदाराला अथवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्या खातेदाराने कोरोनाचे प्रमाणपत्र बँकेत सादर केले. तर त्यांना व्याजदरात दहा टक्के अतिरिक्त : (Mahagramin Baliraja Tarnhar Yojana) सवलत दिली जाणार आहे. अशी व माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुष्काळ, अतिवृष्टी, तसेच इतर नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना संसर्गामुळे बँकेचे थकीत कर्जदार अडचणीत सापडले आहे. अशा परिस्थितीत बँक खातेदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

शेतकऱ्यांनी आणि थकीत कर्जदरांनी कर्जाची परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन घारड यांनी केले. यावेळी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संजय वाघ, मुख्य व्यवस्थापक संतोष प्रभावती यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाग्रामीण तारणहार योजनेचा लाभ ?

महाग्रामीण बळीराजा तारणहार अभिनव योजनेचा लाभ कसा घ्यावा ?. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये जाऊन आपण या योजनेची सदरील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. कोणत्या थकीत कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला जवळील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा या ठिकाणी उपलब्ध होईल. त्या ठिकाणी भेट देऊन जाणून घेऊ शकता.


📢 80% अनुदानावर ठिबक, तुषार ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 ९५% अनुदानावर कुसुम सोलर पंप योजना :- येथे पहा 

Leave a Comment