Maharashtra Weather Alert :- परतीच्या पावसाचे वेध लागल्यामुळे मराठवाड्यात चिंता वाढली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे मोठी तूट निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवसात समाधानकारक पाऊस
पडण्याचा अंदाज आहे. धरणात पाणीसाठा नसल्यामुळे विभागात बिकट स्थिती आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रवात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणे अपेक्षित आहे.
Maharashtra Weather Alert
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार २१ सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात पाऊस होईल. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना,
बीड व जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
चक्रवात निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडणे अपेक्षित आहे. या पावसामुळे विभागातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरुन निघेल. परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे.
📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल