Mahatma Phule Jan Arogya Yojana Marathi :- आता सर्व शिधापत्रिका धारकांना 05 लाख रुपये मिळणार आहे. तरी 05 लाख रुपये कोणत्या शिधापत्रिकाधारकांना कसे मिळणार आहेत. कोणती योजना आहे ? या संबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आता शिधापत्रिकाधारकांना 05 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. हा विमा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख रुपये संरक्षणाची मर्यादा वरून पाच लाख रुपये पर्यंत करण्यात आली आहे. याचीच माहिती या ठिकाणी खाली जाणून घेऊया.
Mahatma Phule Jan Arogya Yojana Marathi
राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबांना चांगले वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत आता सर्व शिधापत्रिकाधारकांना पाच लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
यापूर्वी पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांना या योजनेअंतर्गत दीड लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते. आता पांढरी शिधापत्रिकाधारक कुटुंब तसेच कोणत्याही प्रकारचे शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना या योजनेत विमा संरक्षण मिळणार आहे.
📂 हेही वाचा :- आता या महिलांसाठी केंद्र सरकार देणार 6,000 रुपये, पहा कोणाला कसा मिळणार लाभ ? तुम्ही असाल का पात्र ?
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
यामुळे राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांना विमा संरक्षण आता 5 लाख रुपये पर्यंत घेता येणार आहे. आता दीड लाख रुपयाच्या विमा संरक्षणाची मर्यादा आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. मूत्रपिंडशास्त्रक्रिया या योजनेअंतर्गत उपचाराच्या खर्चाची मर्यादा
प्रति रुग्ण अडीच लाख वरून साडेचार लाख रुपये करण्यात आली. याबाबत मंत्रिमंडळाच्या 28 जून 2023 रोजी झालेले बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि यासंबंधीतील शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजना मध्ये रुग्णालयांची संख्या 1000 एवढी करण्यात आली आहेत. अशा प्रकारे आता राज्यातील जे काही सर्व शिधापत्रिका धारक नागरिकांना 5 लाख रुपये या ठिकाणी त्यांचा जो विमा आहे हा मिळणार आहे.