Mahatma Phule Jan Arogya Yojana | महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेचे दोन्ही एकत्र कार्ड मिळणार पहा हा नवीन निर्णय !

Mahatma Phule Jan Arogya Yojana :- महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचे कार्ड हे नागरिकांना एकत्र मिळणार असून यासाठी शासनाकडून 5 लाख रुपयांचा लाभ देण्यात येत असतो.

आता हे दोन्ही एकत्र कार्ड कसे मिळणार आहे ? कोणाला 5 लाख रुपये पर्यंत लाभ घेता येतो ?. नेमकी योजना काय आहे ? ही सविस्तर प्रक्रिया आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

Mahatma Phule Jan Arogya Yojana

राज्यातील सर्वसामान्य नागरिक आजारी, किंवा ऑपरेशन असेल किंवा त्यांना काही आजार झाला असेल तर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राबवली जाते.

ही योजना देशभरात राबवली जात आहे, त्यामुळे दवाखान्याचा जो खर्च आहे हा आता कमी होणार आहे. आणि यासाठीच दोन्हीही योजना अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत, यांना आर्थिक सहाय्य हे मिळत असते.

महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे ?राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जाते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी कोण पात्र आहे?महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी पात्र असतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी राज्यातील केवळ एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीच पात्र असतील
आयुष्मान कार्ड कसे काढायचे ?सीएससी केंद्रावर जाऊन तुमच्या अंगठ्याचा ठसा देऊनसुद्धा आयुष्मान कार्ड काढू शकता.
 
मला महात्मा फुले योजना कशी मिळेल?
 महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना कार्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला जवळच्या सामान्य, महिला/जिल्हा/नेटवर्क हॉस्पिटलशी संपर्क साधावा लागेल. 
आयुष्मान कार्ड official website ?https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintCard
महात्मा फुले जन आरोग्य योजना वेबसाईट ?  https://www.jeevandayee.gov.in/

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

दोन्हीही योजनेअंतर्गत 5 लाख रुपये पर्यंतचा विमा हा दिला जातो. सर्वसामान्य जनतेसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे. आता आयुष्मान भारत कार्ड योजना आणि राज्यांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य

योजना ही एकत्रपणे आता राबविण्यात येणार आहे. याशिवाय जे नागरिक योजनेत पात्र आहे त्यांना संयुक्त कार्ड देखील दिले जाणार आहे. हे नागरिक आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना ऑपरेशनसाठी 05 लाख रुपये आणि याशिवाय उपचारासाठी देखील सहाय्य केले जाणार आहेत.

Mahatma Phule Jan Arogya Yojana

✅ हेही वाचा :- SC/ST/NT/OBC/SBC प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !

आयुष्मान भारत कार्ड योजना

जन औषधी केंद्र आणि इतर खाजगी मेडिकल मधील औषधांची जर तुलना तुम्ही केली तर औषधी निम्म्या किमतीत ही औषधी मिळतात. आणि तुम्ही याविषयी म्हणजे जनऔषधी केंद्र हे तुम्ही ऐकलंच असणार आहे.

आता एवढेच नाही तर अर्थातच प्रत्येक गावातील अशा वर्कर तुम्हाला हे कार्ड डाऊनलोड करून देण्यास मदत देखील करणार आहेत. यासाठी त्यांना 5 रुपये फी लागणार आहेत.

Mahatma Phule Jan Arogya Yojana

✅ हेही वाचा :- डोमेसाईल प्रमाणपत्र घरी बसून काढा ऑनलाईन, जाणून घ्या एकाच ठिकाणी कागदपत्रे, पात्रता, लाभ, सविस्तर माहिती !

आयुष्मान भारत योजनेचे कार्ड डाउनलोड कसे करायचे ?

नागरिक हे आयुष्मान कार्ड मोफत देखील डाऊनलोड करू शकता. आयुष्मान भारत योजनेचे कार्ड मोफत डाउनलोड कसे करायचे याची माहिती देखील शेवटी दिलेली आहे.

तिथे तुम्ही डाऊनलोड करू शकता. आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभार्थ्यांना त्यांच्या आजारावर खर्च झालेला पैसे जे विवरण संदर्भातील संदेश पाठवले जाणार आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड डाउनलोड

या संदर्भातील नुकतीच मीटिंग शासनाकडून आयोजित करण्यात आलेली आहे. आणि दोन्ही योजना एकत्र करून नागरिकांना मोठा लाभ आता हा मिळणार आहे. अशा प्रकारे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान

भारतीय योजनाचे दोन्ही जे काही कार्ड आहेत. आता दोन्ही कार्ड एकत्र करून मिळणार आहे. या सोबत 5 लाख रुपयांचा जो काही लाभ आहे, हा आता मिळणार आहे. यासंबंधीतील अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उपलब्ध होणार आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana

✅ हेही वाचा :- तुम्हाला हा कायदा माहिती का ? सासऱ्याच्या आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलींना व सुनेला मिळतो एवढा हक्क, जाणून घ्या हा कायदा !

MJPJAY हेल्पलाईन नंबर

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटला भेट देऊ शकता, किंवा खालीलप्रमाणे हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून माहिती मिळवू शकता.
  • 155388
  • 18002332200 
  • Official Website :- jeevandayee.gov.in
  •  List of Id Proofs :- Click Here
Mahatma Phule Jan Arogya Yojana

✅ हेही वाचा :- तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !

आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड कसे करायचे ?

मोबाईल नंबर से आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जा. क्रोम ब्राउझरच्या सर्च बॉक्समध्ये https://setu.pmjay.gov.in/setu/smile-tss लिहा, त्यानंतर तुम्ही त्या वेबसाइटवर पोहोचाल.


मी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत नाव कसे नोंदवू शकतो?

आयुष्मान कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहात की नाही हे खालीलपैकी कोणत्याही एका टोल-फ्री नंबरवर – 14555 किंवा 1800-111-565 वर कॉल करून जाणून घेऊ शकता.

आयुष्मान कार्ड ऑनलाइन काढता येथे का ?

आयुष्मान मित्र स्वयंसेवक त्यांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) ऑनलाइन तयार करून देशातील प्रत्येकाला आणि कोणालाही ABDM शी जोडण्यात मदत करू शकतात

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !