Mahila Samman Bachat Patra Yojana | महिलांनो आताच या योजनेत 2 लाख गुंतवून 2 वर्षांत मिळतोय तब्बल एवढा परतावा !

Mahila Samman Bachat Patra Yojana :- आज या लेखामध्ये महत्वपूर्ण योजनाची माहिती जाणून घेऊया. जी महिलांसाठी खूपच महत्वपूर्ण आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 या मध्ये करण्यात आली.

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना शासनाने 01 एप्रिल 2023 रोजी अधिकृतपणे या योजनेला लॉन्च करण्यात आलं आहेत. सदर ही योजना खासकरून महिलांसाठी सुरू केली आहेत. या योजनेवर महिलांसाठी 7.5% इतका वार्षिक व्याज दिला जातो.

Mahila Samman Bachat Patra Yojana

यामध्ये तिमाही आधारावर व्याज खात्यात जमा केले जाते. आणि कोणतेही खातेदार वार्षिक 1 हजार ते 2 लाख रुपये जमा करू शकतात. महिला सन्मान बचत पत्र योजना 31 मार्च 2025 पर्यंत 2 वर्षासाठी उपलब्ध होते.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि सहभागी खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला बचत प्रमाणपत्र योजना खाती उघडण्यासाठी अधिकृत केलेले आहे. याशिवाय देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेची सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी खाते उघडू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना काय आहे?

थोडक्यात समजून घेऊया, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांना बचतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि अधिक व्याज देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना 01 एप्रिल 2023 पासून देशभरात सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत फक्त भारतीय महिलांनाच लाभ मिळतो. यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिलांना महिला बचत सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, आणि फोटो आवश्यक आहेत.

भारत सरकारची ही एकवेळ योजना आहे. मुदतपूर्ती पूर्ण झाल्यावर खात्रीशीर उत्पन्न मिळते. महिला सम्मान बचत पत्र योजनेत 2 वर्षासाठी पैसे जमा खातात येतात. किंवा तुम्ही 2 वर्षे पैसे जमा करू शकतात.

📝 हे पण वाचा :- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

दोन लाख रुपये गुंतवून तुम्हाला दोन वर्षात किती पैसे मिळतील ?

यात थोडक्यात माहिती पाहूया, तुम्ही 2 लाख गुंतवले असल्यास तुम्हाला पहिल्या तीन महिन्यानंतर तुम्हाला 3,750 व्याज मिळेल. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी ही रक्कम पुन्हा गुंतवल्यानंतर 3,820 रुपये व्याज मिळेल.

त्याच नुसार योजना परिपक्व झाल्यानंतर एकूण 2 लाख 32 हजार 44 रुपये इतके प्राप्त होतात. अशा पद्धतीची ही महिला सन्मान बचत पत्र योजना शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिसशी संपर्क करा.

त्या ठिकाणी पोस्टमास्टर संपूर्ण माहिती देऊन तुमचे खाते या योजनेसाठी उघडू शकतात. अशी ही महत्त्वपूर्ण योजना आहे, अशाच माहितीसाठी आपल्या वेबसाईटला पुन्हा भेट देत रहा धन्यवाद….

📝 हे पण वाचा :- काय सांगता ? फक्त 115 महिन्यांत पोस्टाची ही योजना करते पैसे दुप्पट फक्त असा घ्या लाभ त्वरित !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *